Aishwarya Musale
पावसात भिजल्यानंतर काही लोकांच्या शरीराला खूप खाज सुटते. ही खाज कधी कधी इतकी तीव्र असते की खाज सुटलेल्या ठिकाणी जखमाही तयार होतात.
या ऋतूत हवेतील आर्द्रता वाढल्याने खाज सुटते. याशिवाय घामामुळेही खाज सुटू शकते. मान, चेहरा, हात, पायाचे तळवे आणि हाताखालील भागात म्हणजेच काखेत जास्त खाज येते.
बदलत्या हवामानामुळे होणारी ही खाज दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आणि लोशन लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतरही खाज सुटण्याची समस्या बरी होतेच असं नाही.
नारळाचे तेल किंवा खोबरेल तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
त्याचा वापर हा खाज, इन्फेक्शन आणि त्वचेवर पुरळ येण्याच्या समस्येपासून लवकर आराम देण्यासाठी गुणकारी ठरतो. याशिवाय खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉयश्चरायझर देखील आहे.
हे त्वचेमध्ये फिलाग्रिनचे प्रमाण वाढवते, ते एक प्रकारचे प्रोटीन आहे. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि पीएच संतुलनही राखले जाते.
खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून खाज येणा-या ठिकाणी लावा.
रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी आंघोळीनंतर देखील हे तेल लावावे. खोबरेल तेल हे त्वचेच्या संसर्गासाठी सर्वात प्रभावी उपाय मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.