सकाळ डिजिटल टीम
अनेकांना अभ्यासाचा कंटाळा येतो. शाळा, महाविद्यालय किंवा मग तरुण मंडळी बऱ्याचजणांना अभ्यास करु वाटत नाही.
अभ्यासाला अशा ठिकाणी बसा जिथे खोलीचे तापमान सामान्य असेल आणि शांतात असेल.
जास्त काळ बसावे लागत असल्यास खोलीच्या बाहेर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावा. जेणेकरुन कुणामुळे लक्ष विचलीत होणार नाही.
अगदी सहजसोपे वेळापत्रक तयार करा. म्हणजे तुम्हाला अभ्यास कंटाळवाना वाटणार नाही.
६ ते ७ तासांची झोप घ्या. ज्यामुळे तुम्ही वाचले आहे ते तुमच्या लक्षात ठेवण्यास मदत होईल आणि एकाग्रता वाढेल.
अभ्यासाच्या टेबलवर बसताना नेहमी शांत चित्ताने बसा आणि अभ्यास करताना इतर कशाचाही विचार करु नका.
अभ्यासाला बसल्यावर फोनपासून दूर रहा. फोन जवळ असेल तर अभ्यास नीट होत नाही.
प्रगती होत असेल तर अतिउत्साही होऊ नका. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पुन्हा अभ्यास करु वाटणार नाही.
नेहमी अभ्यास पूर्ण करा, आजचा आज आणि उद्याचा उद्या. अशी सवय लावली तर शेवटी गडबड करण्याची वेळ येणार नाही. मात्र मेहनत करावी लागणारच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.