Anuradha Vipat
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम पार पडला
अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगमध्येही नीता अंबानी यांच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
अनंत व राधिकाच्या हस्ताक्षर सेरेमनीमध्ये नीता अंबानी यांनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली चंदेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली होती
त्याचबरोबर त्यांनी गळ्यात हिरव्या रंगाच्या पन्ना हिऱ्याचा हार घातला होता.
नीता अंबानी यांच्या गळ्यातील हारची किंमत जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.