Amit Ujagare (अमित उजागरे)
मेंदूचं आरोग्य टिकवून ठेवणं हे खूपच महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही काय खाता हे देखील महत्वाचं आहे.
शरिरातील मेंदू हाच तुमच्या शरिरातील सर्व अवयवांचं नियंत्रण करत असतो त्यामुळं त्याचं आरोग्य राखणं गरजेचं आहे.
मेंदूला आरोग्यपूर्ण आणि ताजतवानं ठेवण्यासाठी पाच पदार्थ खाणं खूपच गरजेचं आहे.
हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारात महत्वाच्या आहेत. कारण यामध्ये अॅटिऑक्सिडंट असतात. यामध्ये व्हिटॅमिन के, ल्युटेन, बिटा कॅरटिन ही जीवनसत्व असतात.
बोरांसारखी बारीक आंबट-गोड फळांचं नियमितपणे सेवन करा. यातील अॅटिऑक्सिडंट, अँटि इफ्लॅमिटरी घटक मेंदूंच्या पेशींचं संरक्षण करतात. त्यामुळं तुम्ही ताण-तणाव सहन करु शकता.
आक्रोडमध्ये बदाम, शेंगदाणे यांच्यापेक्षा ओमेगा ३ फॅटी अॅसिट मोठ्या प्रमाणावर असतात. हे आपल्या मेंदूच्या वाढीसाठी खूपच महत्वाचं असतं.
हळदीतील अॅटिइनफ्लेमेंटरी, अॅन्टिऑक्सिडंट यामुळं स्मरणशक्ती सुधारते.
डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यातील वनस्पतीजन्य पदार्थ हे मेंदूच्या पेशी नुकसान होण्यापासून संरक्षण करतं.