अनिरुद्ध संकपाळ
युसूफ पठाणने टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताकडून पदार्पण केलं होतं. सेहवाग फिट नसल्याने पठाणला संधी मिळाली होती. टी 20 वर्ल्डकप फायनलमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा युसूफ हा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.
दुलीप ट्रॉफी ही भारतातील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. त्यात युसूफ पठाणने फक्त 51 चेंडूत शतक ठोकत विक्रम केला होता.
अ श्रेणी क्रिकेटमध्ये सुसूफ पठाणच्या नावावर सर्वात वेगवान शतक आहे. त्याने महाराष्ट्रविरूद्ध 40 चेंडूत शतक ठोकलं होतं. हे रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे.
युसूफ पठाण हा आयपीएलमध्ये सर्वात वेगाने शतक ठोकणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरूद्ध 37 चेंडूत शतक ठोकले होते.
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या यादीत सर्वात चांगले स्ट्राईक रेट हे युसूफ पठाणचेच आहे. त्याने 57 सामन्यात 810 धावा केल्या आहेत. या धावा त्याने 113.60 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. युसूफनंतर पांड्याचा (110.35) नंबर येतो.