Pranali Kodre
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा 1 जून ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) येथे खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी अवघे 36 दिवस राहिलेले असताना आयसीसीने भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला या स्पर्धेचे अँबेसिडर म्हणून निवडले आहे.
युवराज 2007 टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे.
तसेच युवराजने 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच षटकात 6 षटकार मारण्याचा पराक्रमही केला होता. त्यावेळी त्याने एकाच षटकात ३६ धावा काढल्या होत्या.
त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच 12 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रमही युवराजने 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये केला होता.
दरम्यान, आता युवराजला टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अँबेसिडर निवडल्याने तो या स्पर्धेच्या अनेक प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये सहभागी होईल.
त्याचबरोबर तो काही सामन्यांनाही हजेरी लावण्याची शक्यता आहे, यात न्युयॉर्कला 9 जून रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचाही समावेश आहे.
दरम्यान, युवराजपूर्वी आयसीसीने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता धावपटू उसेन बोल्ट आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यांचीही टी20 वर्ल्डकप 2024 अँबेसिडर म्हणून निवड केली आहे.