Swadesh Ghanekar
माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान हा IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) ला मार्गदर्शन करणारा आहे.
झहीर यापूर्वी मुंबई इंडियन्सचा ग्लोबल डेव्हलपमेंट टीमचा प्रमुख होता. तो LSG मध्ये दिसणार आहे.
LSG चे मालक संजीव गोएंका यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
मेंटॉरपदासह झहीर खानकडे गोलंदाजी प्रशिक्षकाचीही जबाबदारी असणार आहे.
''हा एक खास प्रवास असेल. मी या शहरात बरेच सामने खेळलो आहे, बराच वेळ घालवला आहे,”असे झहीर खान म्हणाला.
झहीरने ९२ कसोटी, २०० वन डे आणि १८ ट्वेंटी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ६१० विकेट्स घेतल्या.
झहीर खान २०१८ ते २०२२ या कालावधीत मुंबई इंडियन्ससोबत होता. MI सह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
गौतम गंभीरने साथ सोडल्यानंतर LSG मध्ये हे पद रिक्त होतं आणि झहीर त्याची रिप्लेसमेंट ठरला.
लखनौ सुपर जायंट्स झहीर खानला अडीच महिन्यांच्या कामासाठी ३.५ ते ५ कोटी पर्यंत पगार देऊ शकतात.