झिका व्हायरसपासून असा करा बचाव

Monika Lonkar –Kumbhar

झिका व्हायरस

पुण्यात झिका व्हायरसचे एकूण ३ रूग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

डासांमार्फत पसरणारा हा आजार गंभीर समस्या निर्माण करू शकतो.

लक्षणे

डोकेदुखी, स्नायुंचा त्रास, शरिरावर बारिक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या आजाराची लक्षणे आहेत. हा आजर पसरू नये म्हणून काय काळजी घ्यायची? जाणून घेऊयात.

पाणी साचू देऊ नका

झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. कारण या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते.

फूल बाह्यांचे कपडे घाला

डासांपासून बचाव करण्यासाठी फूल बाह्यांचे कपडे घाला.

कडुलिंब

घरात डास आले तर त्यांना पळवून लावण्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा

कडुलिंब-नारळाचे तेल

कडुलिंब आणि नारळाचे तेल एकत्र करून तुमच्या शरीरावर चोळा.

सोनाक्षीच्या साडीपेक्षा तिच्या हिरव्या चोकरचीच जास्त चर्चा..!

येथे क्लिक करा.