Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे.
या दोन्हींचा योग्य समतोल राखला की, शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते.
सदृढ शरीरासाठी आपण आहारात जीवनसत्वे, प्रथिने, झिंक आणि इतर खनिजांचा समावेश करणे आवश्यक आहे.
जर शरीरात झिंकची कमतरता निर्माण झाली तर आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे.
दही हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात झिंक आढळून येते.
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा. पालक, मेथी, मटार, तांदूळसा इत्यादी भाज्यांमध्ये झिंकसोबतच इतर पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते.
आरोग्यासाठी फायदेशीर असणारे शेंगदाण्यांना झिंकचा उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते. या शेंगदाण्यांमध्ये झिंकसोबत लोह, जीवनसत्वे, व्हिटॅमीन ई, पोटॅशिअम आणि फायबरचे भरपूर गुणधर्म आढळून येतात.