इलेक्ट्रॉनिक्स मार्टच्या शेअर्सना 10% अप्पर सर्किट, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाकडून 24 लाख शेअर्सची खरेदी

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या शेअर्समध्ये मंगळवारी एनएसईवर 10 टक्क्यांनी अप्पर सर्किट लागले आणि त्याची किंमत 92.95 रुपयांवर पोहोचली.
shares
sharesgoogle
Updated on

मुंबई : मंगळवारी 18 ऑक्टोबरला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या (Electronics Mart India) शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनद्वारे कंपनीतील 0.6 टक्के अतिरिक्त हिस्सेदारी विकत घेतल्यानंतर ही तेजी दिसून आली.

त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या शेअर्समध्ये मंगळवारी एनएसईवर 10 टक्क्यांनी अप्पर सर्किट लागले आणि त्याची किंमत 92.95 रुपयांवर पोहोचली.

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा आयपीओ सोमवारी 17 ऑक्टोबरला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाला. पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर 43 टक्क्यांच्या मोठ्या तेजीसह 84.50 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली, ज्यावर आधीच तज्ज्ञांनी शिक्कामोर्तब केले होते.

एक्सचेंजेसवरील बल्क डीलशी संबंधित माहितीनुसार, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने कंपनीचे 24 लाख शेअर्स अर्थात 0.6 स्टेक खरेदी केले आहेत. हे शेअर्स सरासरी 89.42 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यात आले आहेत.

याआधी 3 ऑक्टोबरला, इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा आयपीओ उघडण्याच्या एक दिवस आधी, Nippon India MF ने अँकर गुंतवणूकदार म्हणून कंपनीचे 33.89 लाख शेअर्स खरेदी केले होते. निप्पॉन इंडिया एमएफने हे शेअर्स निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड आणि निप्पॉन इंडिया कन्झम्पशन फंड या दोन स्कीमसाठी खरेदी केले होते.

हे शेअर्स आयपीओसाठी 59 रुपयांच्या इश्यू प्राइसवर खरेदी करण्यात आले होते. हे सर्व शेअर्स एकत्र करून निप्पॉन इंडियाकडे कंपनीमध्ये आता 1.5 टक्के हिस्सा आहे. याशिवाय, सोमवारी बीएनपी परिबास ऑर्बिट्रेजने पन मार्केटमधून इलेक्ट्रॉनिक्स मार्टचे 33.21 लाख शेअर्स सरासरी 88.58 रुपये दराने खरेदी केले.

इलेक्ट्रॉनिक्स मार्टच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीतील म्युच्युअल फंडांची एकूण होल्डिंग आता 4.45 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडे कंपनीत 2.48 टक्के हिस्सा आहे, तर किरकोळ गुंतवणूकदारांचा 10.34 टक्के हिस्सा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.