प्रत्येकालाच गुंतवणूक करून आपल्या संपत्तीत वाढ करायची असते, शिवाय कोणत्याही प्रकारची जोखीम अथवा धोका नको असतो. अशावेळी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या स्कीम कामाला येतात. कारण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक कायमच सुरक्षित असते आणि परतावाही चांगला मिळतो.
पोस्ट ऑफिस आरडी
पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट अकाऊंटमध्ये चांगले व्याजदर मिळतात शिवाय लहान हप्ते देण्याची सोय आहे. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.
या स्कीममध्ये पाच वर्षांसाठी अकाउंट उघडले जाते. जमा केलेल्या पैशावर दर तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज दिले जाते आणि ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात चक्रवाढ व्याजासह जमा केले जाते.
किती व्याज मिळेल ?
रिकरिंग डिपॉझिट स्कीमवर 5.8% व्याज सध्या दिले जात आहे, हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.
16 लाखांसाठी किती गुंतवणूक गरजेची ?
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा रुपये मिळतील.
दर महिना गुंतवणूक - 10,000 रुपये
व्याज - 5.8%
मॅच्युरिटी - 10 वर्ष
10 वर्षांनंतर मॅच्युरिटी अमाउंट - 16,28,963 रुपये
- नियम
तुम्हाला नियमितपणे आरडी खात्यामध्ये पैसे जमा करत राहावे लागेल, जर तुम्ही पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. 4 हप्ते चुकल्यानंतर तुमचे खाते बंद केले जाते.
पोस्ट ऑफिस RD वर टॅक्स
रिकरिंग डिपॉझिटमधील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जातो, जर डिपॉझिट 40,000 पेक्षा जास्त असेल तर 10% प्रतिवर्ष दराने कर आकारला जातो. आरडीवर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे, पण संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते FD प्रमाणेच फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करू शकतात.
नोंद : पोस्ट ऑफीसमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी, तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफीसला प्रत्यक्ष भेट देऊन अधिक माहिती घेऊन, मगच गुंतवणूक करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.