2021 Year End : यंदा लॉन्च झाल्या महत्त्वाच्या योजना, तुम्हीही घेऊ शकता लाभ

2021 Year End : यंदा लॉन्च झाल्या महत्त्वाच्या  योजना, तुम्हीही घेऊ शकता लाभ
Updated on

Year End 2021: सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन काही सरकारी योजना सुरु केल्या जातात. पण केंद्र सराकार वेळोवेळी नवीन योजना लॉन्च करतात, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. 2021 वर्ष संपण्यासाठी खूप कमी कालावधी शिल्लक आहे. या वर्षी सरकारने तीन लाभदायत योजना लॉन्च केल्या ज्यांचा फायदा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये इ-श्रम पोर्टल, RBI रिटेल पोर्टल स्किम आणि एकिकृत लोकपाल योजनेचा समावेश आहे, जर तुम्हाला यावर्षी या योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर सविस्तर माहिती जाणून घ्या Lookback 2021

2021 Year End : यंदा लॉन्च झाल्या महत्त्वाच्या  योजना, तुम्हीही घेऊ शकता लाभ
हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना 50 लाख, CMची घोषणा

26 ऑगस्ट 2021मध्ये लॉन्च झाला ई-श्रम पोर्टल (e-Shram Portal)

26 ऑगस्ट 2021 ला केंद्र सराकारने असंगठित कामगार क्षेत्रात कार्यरत देशातील करोडो कामगारांना मोठी भेट दिली आहे. सराकराने कामगारांच्या सुविधा लक्षात घेऊन ई-श्रम पोर्टल e-Shram Portal) लॉन्च केले आहे.या पोर्टलद्वारे सराकार असंठित क्षेत्रातील श्रमिकांना नॅशनल डेटाबेस तयार करते आहे. ज्याच्या मदतीने सरकार सोशल सिक्योरिटी योजना(Social Security Schemes श्रमिकांपर्यंत कमी खर्चात पोहचतात. या अंतर्गत कामगारांना ईश्रम कार्ड दिले जातील, ज्यामध्ये 12 अंकांचा युनिक नंबर असेल. हे कार्ड पूर्ण देशामध्ये वापरता येईल. त्यामुळे श्रमिकांना पूर्ण फायदा होईल. जर ई-श्रम पोर्टलवर पंजीकृत कोणत्याही कर्मचारी दुर्घटनेचे बळी पडल्यास, या योजनेअंतर्गत मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाखांपर्यंतचा लाभ मिळतो. तेच अंशिक अंपगत्वावर कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपये मिळतील.

2021 Year End : यंदा लॉन्च झाल्या महत्त्वाच्या  योजना, तुम्हीही घेऊ शकता लाभ
शाळा बंद आणि शिक्षण ऑनलाइन झाल्यानं मुलांमध्ये ऑनलाइन खेळांचे व्यसन वाढत आहे.

12 नोव्हेंबरला लॉन्च झाली आरबीआय रिटेस डायरेक्ट स्किम ((RBI Retail Direct Scheme)

12 नोव्हेंबर 2021ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आरबीआय रिटेल डायरेक्ट स्किमचा (RBI Retail Direct Scheme) शुभारंभ केला आहे. या योजनेद्वारे किरकोळ गुंणतवणूकदारांना डिजिटली सरकारी बॉन्ड खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी मिळते. केंद्रीय बँकेने याची घोषणा फेब्रुवारी 2021मध्ये केली होती. छोटे गुंतवणूकदार आता आरबीआयसोबत गिल्ट स्किक्युरिटीज खाते (Gilt Securities Account) सुरु करू शकता. त्यामाध्यामातून गव्हरमेंट सिक्योरिटीमध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक खूप सुरक्षित असते. यामध्ये सराकार रिटर्नची गॅरंटी देते. सरकारी बॉन्ड खरेटी आणि विक्रीसाठी वापरता येऊ शकतात.

2021 Year End : यंदा लॉन्च झाल्या महत्त्वाच्या  योजना, तुम्हीही घेऊ शकता लाभ
झूम कॉलवेळी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणाऱ्या सीईओला सक्तीची सुट्टी!

एकीकृत लोकपाल योजना (ntegrated Ombudsman Scheme)

आरबीआय रिटेल डायरेक्ट स्किमसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणखी एक योजना, एकीकृत लोकपाल योजनेचा(Integrated Ombudsman Scheme) शुभारंभ केला होते. त्यांना या योजनेचे हेतू तक्रारी दूर करणाऱ्या प्रणालीमध्ये सुधार करणे आहे. योजनेची थीम एक राष्ट एक लोकपाल संकल्पनेवर आधारित आहे. त्यासाठी ग्राहक एका स्थावर आपल्या तक्रारी नोंदवू शकते आहे. दस्तावेज जमा करू शकता. तक्रारी आणि दस्तऐवजांची स्थिती जाणून घेऊ शकता आणि त्यासोबत उपाय देखील सुचवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()