हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ

b-s-dhanoa
b-s-dhanoa
Updated on

मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही.

हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात.

गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.