पॅन-आधार लिंकिंगसाठी आज अखेरची मुदत! वेबसाईट क्रॅश झाल्याने अनेकांचा जीव टांगणीला

Aadhaar pan linking website crashed on last day link Aadhaar link not working Marathi News
Aadhaar pan linking website crashed on last day link Aadhaar link not working Marathi News
Updated on

नाशिक : ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी आज (ता.३१) शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून आज करू, उद्या करू म्हणत अद्याप पॅन आणि आधार लिंक न केलेल्या लाखो नागरिकांनी आज अखेरच्या दिवशी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर एकाच वेळी लॉगिन केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

३१ मार्च २०२१ आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आयकर कायद्यान्वये एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा होणार असून पॅन कार्ड रद्दची कारवाईही होऊ शकते. सरकारने यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली आहे. मात्र लाखो नागरिकांनी एकाच वेळी यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट दिल्याने आज अखेरच्या दिवशी आयकर विभागाचे संकेतस्थळ क्रॅश झाले आहे. अनेकांनी यासंदर्भात सोशल मीडियामुळे तक्रार करीत या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

 थेट पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना मागणी

आयकर विभागाच्या वेबसाईटवर आज सकाळपासूनच देशातील अनेक नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाच वेळी लाखोंच्या संख्येने ट्रॅफिक आल्याने आयकर विभागाची पॅन व आधार लिंक करण्याची लिंक क्रॅश झाली आहे. आज सकाळपासूनच ही संकेतस्थळ क्रॅश झाल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचं, साईट सुरु होऊ शकत नाही असे संदेश स्क्रीनवर दिसत आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्शन संथगतीने असल्याने नागरिकांची ही प्रक्रिया करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसं करायचं असा प्रश्न सरकारी यंत्रणांना विचारला आहे. तर काहींनी आधार पॅन लिंक करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी थेट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना ट्विटरद्वारे केली आहे. 

आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात बातम्याही दिल्या जात होत्या. मात्र तरीदेखील अनेकांनी लिंक केले नसल्याने आजच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या आयकर विभागाच्या संकेतस्थळावर उड्या पडल्या आहेत. एकीकडे साईट क्रॅश झालेली असताना दुसरीकडे बँकांचे मेसेज ग्राहकांना टेन्शन देत आहेत. सोशल मीडियावर आयकर विभागाची लिंक बंद पडल्याच्या तक्रारी होत आहेत. 

मध्यरात्रीपर्यंत प्रयत्न करत राहावे लागणार आहेत

आधार पॅन लिंक करण्याची आजची शेवटची तारीख असताना ज्यांचे लिंकिंग अद्यापही झाले नसेल अशा नागरिकांना आज मध्यरात्रीपर्यंत प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. आयकर विभागाने २०१९ मध्ये पहिल्यांदा आधार पॅन जोडणे बंधनकारक केले होते. यानंतर सातत्याने याची डेडलाईन वाढविण्यात येत होती. दोन वर्षे देऊनही अद्याप करोडो नागरिकांनी आपले पॅन आधार लिंक केलेले नाहीत. दरम्यान, हा गोंधळ पाहता अनेकांनी आज असणारी शेवटची तारीख पुन्हा वाढवून दिली जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. मात्र ही बातमी देईपर्यंत डेडलाइन वाढवण्यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.

पॅन आधारशी लिंक केले नाही तर काय?

केंद्र सरकारने वित्त विधेयक २०२१ च्या अंतर्गत प्राप्तिकर अधिनियम १९६१ मध्ये जोडलेला कलम २३४ एच हा कायदा नुकताच २३ मार्च रोजी लोकसभेत मंजूर करून घेतले आहे. या कायद्यांतर्गत जर आपण सरकारने दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत आधार पॅनशी जोडले नाही तर तुमच्याकडून जास्तीत जास्त एक हजार रुपये दंड आकारला जाईल. शेवटच्या तारखेपर्यंत आपण आधार पॅन लिंकची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.