मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अबु धाबीस्थित गुंतवणूकदार कंपनी, मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी ९,०९३.६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुबादलाच्या जिओमधील गुंतवणूकीचे इक्विटी मूल्य ४.९१ लाख कोटी रुपये इतके असणार आहे तर एंटरप्राईस मूल्य ५.१६ लाख कोटी रुपये इतके असणार आहे. या गुंतवणूकीमुळे मुबादलाला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये १.८५ टक्के हिस्सा मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्सकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.
या गुंतवणूकीसह रिलायन्सने आता जिओ प्लॅटफॉर्म्समधील एकूणम १९ टक्के हिस्सा विकला आहे. सहा आठवड्यात जिओमधील ही सहावी गुंतवणूक आहे. मुबादलाच्या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सद्वारे रिलायन्सने एकूण गुंतवणूक ८७,६५५.३५ कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. जिओमध्ये जगातील आघाडीच्या तंत्रज्ञानविषयक आणि आघाडीच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. यात फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर यांचा समावेश आहे.
'माझ्या अबु धाबीबरोबर असलेल्या प्रदीर्घ संबंधांच्या माध्यमातून मुबादलाचे, युएईच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात विविध क्षेत्रात आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासंदर्भातील योगदान मी व्यक्तिश: बघितले आहे. मुबादलाच्या अनुभवातून आणि ज्ञानातून जगभरात केलेल्या वाटचालीचा लाभ रिलायन्सला होईल अशी मला आशा आहे', असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले आहे.
'जिओने भारतातील दूरसंचार क्षेत्र कसे बदलून टाकले आहे हे आम्ही बघितले आहे. एक गुंतवणूकदार आणि भागीदार म्हणून आम्ही भारताच्या डिजिटल विकासात योगदान देण्यास कटिबद्ध आहोत. जिओच्या गुंतवणूकदार आणि भागीदारांच्या नेटवर्कद्वारे जिओ प्लॅटफॉर्म्स डिजिटल अर्थव्यवस्थेला आणखी पुढे नेईल याची आम्हाला खात्री आहे', असे मत मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी खालदून अल मुबारक यांनी व्यक्त केले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अबु धाबीच्या अर्थव्यवस्थेला तंत्रज्ञानविषयक प्रगतीपथावर नेण्यसंदर्भात दूरसंचार क्षेत्र, कॉग्निटिव्ह कम्प्युटिंग, आयसीटी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये मुबादला गुंतवणूक आणि भागीदारी करते आहे. २०१७ मध्ये कंपनीने गुंतवणूक उपकंपनी सुरू केली होती. त्याद्वारे इनोव्हेटिव्ह व्यवसायात गुंतवणूक कंपनीने केली आहे. मुबादलाची अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेत गुंतवणूक आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्स ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. रिलायन्सच्या सर्व डिजिटल आणि मोबिलिटी व्यवसायाला एकाच छत्राखाली आणण्यासाठी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे आता रिलायन्स जिओ इन्फोकॉम, मायजिओ, जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओन्यूज आणि जिओसावन हे सर्व उपक्रम जिओ प्लॅटफॉर्म्सचा छत्राखाली आले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये १.०८ लाख कोटी रुपयांचे भांडवल ओतलेले आहे. रिलायन्सला अलीबाबा आणि गुगलप्रमाणेच जिओला उभे करायचे आहे. रिलायन्स मागील काही वर्षांपासून आपल्या पेट्रोलियम व्यवसायातील उत्पन्न दूरसंचार आणि रिटेल व्यवसायात गुंतवते आहे. रिलायन्सने जिओ उभी करण्यासाठी ४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.