नेल्कोच्या शेअर्समध्ये गुणंवणूक कराताय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते येत्या काळात या स्टॉकमध्ये 630 रुपयांची पातळी दिसू शकते.
Share
ShareSakal media
Updated on

- शिल्पा गुजर

नेल्कोच्या शेअर्सने मे महिन्यापासून गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. नेल्को हा देशातील अग्रगण्य आणि तब्बल 116 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय असणाऱ्या टाटा समूहाचा एक भाग आहे. नेल्को आपल्या ग्राहकांना व्ही-सॅट (very small aperture terminal) कनेक्टिव्हिटी सोल्यूशन सेवा देते. मे महिन्यापासून हा स्टॉक 168 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकाने याच कालावधीत केवळ 29 टक्के परतावा दिला आहे. या स्टॉकची सध्याची तेजी सुमारे 1 वर्षांच्या कंसोलिडेशननंतर सुरू झाली. 15 सप्टेंबरच्या ट्रेडिंगमध्ये हा शेअर बीएसईवर 538.75 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.

Share
'जनधन'मुळे सर्वसामान्य आर्थिक साक्षर, निर्मला सीतारमन यांचे मत

गुंतवणूक धोरण काय असावे ?
नेल्कोचा स्टॉक नजीकच्या काळात 630 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण सध्या हा स्टॉक घेणं योग्य ठरणार नाही असेही तज्ज्ञ सांगत आहेत कारण मे महिन्यापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये जोरदार वाढ झाली आहे. ही कंपनी डिजिटल इंडिया मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग असेल असे एसएसजे फायनान्स अँड सिक्युरिटीजचे (SSJ Finance & Securities) अतिश मातलावाला म्हणतात. ज्याचा आणखी फायदा होईल, पण आता हा स्टॉक खूप चालला आहे असे दिसते आहे आणि अशा स्थितीत किमान अर्धा नफा वसूल करणे योग्य ठरेल असा सल्लाही मातलावाला यांनी दिला आहे.

2020 मध्ये या स्टॉकला थोडी उशीरा गती मिळाली, त्यात 175-240 रुपयांच्या दरम्यान कंसोलिडेशन बघायला मिळाल्याचे जीईपीएल कॅपिटलचे (GEPL Capital) म्हणणे आहे. पण जून 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात तेजी बघायला मिळाली. या स्टॉकमध्ये 400 रुपयांच्या तेजीचा पहिला टप्पा पाहिला आणि आता तेजीच्या पुढच्या फेरीत, हा स्टॉक 630 रुपयांच्या दिशेने जाईल असेही जीईपीएल कॅपिटलचे (GEPL Capital) म्हणणे आहे.

Share
हिंदुस्थान कॉपरचा ऑफर फॉर सेल आजपासून खुला

चांगल्या व्हॉल्यूमसह हा स्टॉक तेजीचा टप्पा दाखवत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे (Choice Broking) सचिन गुप्ता म्हणाले. अल्पावधीत या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून येईल. हा स्टॉक येत्या काळात 590-610 रुपयांपर्यंतची जाऊ शकतो असेबी गुप्ता म्हणाले.
सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे टाळा असा सल्ला एसएसजे फायनान्स अँड सिक्युरिटीजचे (SSJ Finance & Securities) विरल छेडा यांनी दिला आहे. हा स्टॉक 400-450 रुपयांच्या आसपास आल्यास 600 ते 700 रुपयांचे लक्ष्य ठेवून 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करा असेही ते म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()