स्मार्ट माहिती : डिजिटल पेमेंटसाठी स्विफ्ट प्रणाली

‘ई-बँकिंग’ ही काळाची गरज झाली आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर बँकिंग, मोबाईल बँकिंग, डिजिटल बँकिंग, डेबिट कार्ड वा क्रेडिट कार्डचा वापर, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर, डिजिटल पेमेंट आदी सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांचे जीवन हे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टिकोनातून खूप सुरळीत झाले आहे.
E-Banking
E-BankingSakal
Updated on

‘ई-बँकिंग’ ही काळाची गरज झाली आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर बँकिंग, मोबाईल बँकिंग, डिजिटल बँकिंग, डेबिट कार्ड वा क्रेडिट कार्डचा वापर, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर, डिजिटल पेमेंट आदी सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांचे जीवन हे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टिकोनातून खूप सुरळीत झाले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे कोणतीही माहिती आज बँका इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवू वा पाठवू शकतात. ‘ई-बँकिंग’ व माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने निधी हस्तांतर (मनी ट्रान्स्फर) सुटसुटीत, जलद झाले आहे. आयएफएससी प्रणाली, स्विफ्ट प्रणाली हा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरचा एक भाग आहे. आयएफएससी प्रणालीच्या साह्याने देशातील निधी हस्तांतर, तर स्विफ्ट प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतर सुरळीत होते. स्विफ्ट प्रणाली ही एक जागतिक आंतरबँक आर्थिक दूरसंचार सेवा पुरवणारी संस्था आहे. ही संस्था ब्रुसेल्स, बेल्जियमस्थित आहे. स्विफ्ट ओव्हरसाईट फोरम, या आंतरराष्ट्रीय फोरममध्ये अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पण सहभाग आहे. ही प्रणाली भारतातील बँकादेखील आत्मसात करीत आहेत.

या प्रणालीबद्दल ठळक मुद्दे जाणून घेऊ

  • स्विफ्ट प्रणाली ही एक सुरक्षित, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक संदेश देणारी यंत्रणा आहे. भारतामध्ये स्विफ्ट प्रणाली ही क्रॉस बॉर्डर पेमेंट करण्यास मदत करते, ज्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठविले जातात.

  • स्विफ्ट प्रणाली ही आर्थिक संदेश (मेसेजिंग) सेवा देणारी व्यवस्था आहे, जी अचूक सेवा बँकांना देते, त्यामुळे एक बँक दुसऱ्या बँकेशी पटकन संपर्क साधून आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर (एनईएफटी), आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतर (मनी ट्रान्स्फर) यासाठी देखील स्विफ्ट प्रणालीचा उपयोग होतो.

  • स्विफ्ट प्रणालीमुळे एक स्टॅंडर्ड स्थापित होते, जे बँकांना फायद्याचे आहे. बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयामधून सर्व शाखांमधील व्यवहार सुरक्षित, लवकर आणि सुलभ होऊ शकतात.

  • स्विफ्ट प्रणालीनुसार, प्रत्येक बँक, त्यांच्या शाखांना ११ आकडी स्विफ्ट कोड देते, त्यातील ८ आकडे हा बँकेच्या मुख्यालयाचा कोड असतो, तर ३ आकडे हा शाखेचा कोड असतो.

  • स्विफ्ट प्रणाली ही सर्व बँकांसाठी उपयुक्त प्रणाली नक्कीच आहे, पण बँकांनी ही प्रणाली वापरताना सावधगिरी आणि सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे.

(लेखक कर सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.