अदानींनी मागे घेतलेला FPO असतो काय? IPO पेक्षा काय असतं वेगळं? समजून घ्या सोप्या भाषेत

What is FPO in Marathi: आज आपण FPO म्हणजेच फॉलो-ऑन पब्लिक ऑफर म्हणजे काय असते आणि IPO पेक्षा हे वेगळे कसं आहे. यासोबतच हे देखील जाणून घेतले पाहिजे की कंपन्या FPO का आणतात…
adani group fpo cancelled know fpo what is fpo and difference between ipo and fpo in Marathi
adani group fpo cancelled know fpo what is fpo and difference between ipo and fpo in Marathi
Updated on

अदानी समूह आणि अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्ग (Adani Vs Hindenburg) यांच्यातील वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पण यासोबतच अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही देखील चर्चेत आला आहे. हा 20,000 कोटी रुपयांचा FPO मागे घेण्यात आला आहे . पण नेमकं हा एफपीओ म्हणजे असतं काय? (adani group rs20000 fpo Cancelled)

आज आपण FPO म्हणजेच फॉलो-ऑन पब्लिक ऑफर म्हणजे काय असते आणि IPO पेक्षा हे वेगळे कसं आहे. यासोबतच हे देखील जाणून घेतले पाहिजे की कंपन्या FPO का आणतात…

FPO म्हणजे काय? (What is FPO?)

FPO द्वारे, कंपनी आपले फॉलो ऑन पब्लिक ऑफर जारी करते. म्हणजे जी कंपनी आधीपासून स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहे, ती गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स ऑफर करते. हे सध्या बाजारात असलेल्या स्टॉकपेक्षा वेगळे असतात. हे शेअर्स बहुतेक प्रमोटर्सकडून जारी केले जातात. कंपनीच्या इक्विटी बेस मध्ये विविधता आणण्यासाठी FPO चा वापर केला जातो.

adani group fpo cancelled know fpo what is fpo and difference between ipo and fpo in Marathi
Adani Group : 'पुढे जाणं योग्य नव्हतं' FPO परत घेतल्यानंतर अदानींची पहिली प्रतिक्रिया

कंपन्या FPO का घेऊन येतात?

बाजारात शेअर आणण्यासाठी कंपनी प्रथम IPO घेऊन येतात. परंतु, एकदा लिस्टेड झाल्यानंतर, नवीन शेअर्स जारी करायचे असल्यास, त्या बाबतीत एफपीओ वापरला जातो. शेअर भांडवल उभारणी (Capital raising) किंवा कर्ज फेडण्याच्या उद्देशाने कंपनी नवीन शेअर्स जारी करते. नवीन शेअर्सच्या माध्यमातून कंपनी बाजारातून भांडवल उभारते आणि नंतर त्याचा गरजेनुसार वापर करते.

adani group fpo cancelled know fpo what is fpo and difference between ipo and fpo in Marathi
MLC Election Result : भाजप की मविआ? 'या' जागेवरून ठरणार वरचढ कोण; आज शिक्षक-पदवीधरचा निकाल

IPO आणि FPO फरक?

कंपन्या त्यांच्या विस्तारासाठी IPO किंवा FPO वापरतात. जेव्हा व्यवसाय वाढवण्यासाठी निधीची आवश्यकता असते तेव्हा कंपन्या IPO किंवा FPO चा अवलंब करतात. कॅश फ्लो च्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरला जातो.

कंपनी IPO च्या माध्यमातून पहिल्यांदा शेअर्स बाजारात घेऊन येते. म्हणूनच याला इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात. एफपीओमध्ये अतिरिक्त शेअर बाजारात आणले जातात.

adani group fpo cancelled know fpo what is fpo and difference between ipo and fpo in Marathi
Gautam Adani : टॉप-10 मधून बाहेर गेलेले अदानी पुन्हा श्रीमंतांच्या यादीत; अंबानींची आणखी एका स्थानाने घसरण!

IPO मध्ये शेअर्सच्या विक्रीसाठी एक निश्चित किंमत असते, ज्याला किंमत बँड म्हणतात. कंपनीच्या शेअर्सचा प्राइस बँड आघाडीच्या बँकर्सद्वारे ठरवला जातो. त्याच वेळी, एफपीओच्या वेळी, शेअर्सची किंमत बँड बाजारात सध्या असलेल्या शेअर्सच्या किमतीपेक्षा कमी ठेवली जाते. शेअर्सच्या संख्येनुसारही ते ठरवले जाते. सहसा हे शेअर्स कंपनी सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किमतीत देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.