Adani Group : नफा कमावण्यासाठी भारतावर नियोजित हल्ला; हिंडेनबर्गच्या आरोपांना अदानींचे उत्तर

हिंडेनबर्गच्या रिसर्च रिपोर्टनंतर अदानी समुहाला मोठ्या नुकसाला सामोरे जावे लागले आहे.
Gautam Adani
Gautam Adani Sakal
Updated on

Adani Group Answer On Rindenburg Research Report : हिंडेनबर्गच्या (Hindenburg) रिसर्च रिपोर्टनंतर अदानी समुहाला मोठ्या नुकसाला सामोरे जावे लागले आहे.

हिंडेनबर्गच्या या रिसर्च रिपोर्टला गौतम अदानी समुहाने ४१३ पानांचे उत्तर दिले आहे. हिंडेनबर्गच्या या रिपोर्टमध्ये अदानी समुहावर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, या आरोपांना अदानी समुहाकडून उत्तर देण्यात आले असून, हा रिपोर्ट म्हणजे भारताविरूद्धचा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.

Gautam Adani
Adani Group : अदानींचा पर्दाफाश करून त्यांना अडचणीत आणणारा हिंडेनबर्ग रिसर्च काय आहे?

तसेच करण्यात आलेल्या आरोपांवर असहमत असल्याचे म्हणत भारत एक व्हायब्रंट लोकशाही असून, सुंदर भविष्यासह एक उदयोन्मुख महासत्ता असल्याचा विश्वास असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन कंपनीला फायदा मिळवून देणे हाच याचा उद्देश

हिंडेनबर्गचा हा रिपोर्टचा मूळ उद्देश हा केवळ अमेरिकन कंपनीला फायदा मिळवून देणे हा होता. हा रिपोर्ट म्हणजे केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्लाच नाही तर, भारताचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता, विकास आणि महत्त्वाकांक्षेसह भारतीय संस्थांवर पद्धतशीर हल्ला असल्याचे अदानींनी म्हटले आहे.

Gautam Adani
Adani Group : भारतातल्या सर्वात पॉवरफूल उद्योगपतीशी पंगा घेणारा 'हा' माणूस नेमका कोण?

सिक्युरिटीजमध्ये फॉल्स मार्केट तयार करून लहान विक्रेत्यांना नफा मिळेल हाच हिंडेनबर्ग अहवालाचा एकमेव उद्देश असल्याचेही अदानींनी म्हटले आहे. हिंडेनबर्ग अहवालात 88 प्रश्नांची उत्तरे मागवण्यात आली होती, त्यापैकी 65 प्रश्नांची उत्तरे अदानी समूहाने वार्षिक अहवालात उघड केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.