अदानी ग्रुप आता माध्यम क्षेत्रात; संजय पुगालियांकडे जबाबदारी

पुगालिया यांनी यापूर्वी क्वींट डिजिटल मीडियाच्या अध्यपदी कार्यरत होते.
Adani Group
Adani Group
Updated on

नवी दिल्ली : भारतातील बडा उद्योग समुह असलेला अदानी ग्रुप आता माध्यम क्षेत्रात प्रवेश करणार आहे. यासाठी वरिष्ठ पत्रकार संजय पुगालिया यांच्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुगालिया यांची अदानी एन्टरप्रायझेसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तसेच ग्रुपच्या नव्या माध्यम उपक्रमामध्ये 'एडिटर इन चीफ' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पुगालिया हे क्वींट डिजिटल मीडिया लिमिटेडच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाले होते.

Adani Group
छोटे फंड, मोठा फायदा! 'हे' स्मॉलकॅप फंड पाडतायत पैशांचा पाऊस

अदानी कंपनीच्या अंतर्गत निवेदनाद्वारे पुगालिया यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. पुगालिया यांना राजकीय आणि बिझनेस पत्रकारितेचा मोठा अनुभव आहे. क्वींटमध्ये येण्यापूर्वी त्यांनी यापूर्वी CNBC आवाज, टीव्ही १८ आणि CNBC या हिंदी बिझनेस वृत्तवाहिनीत मध्ये मुख्य संपादक म्हणून काम केलं आहे.

Adani Group
‘नावी’ एमएफ इलेक्ट्रिक व्हेईकल आणणार म्युच्युअल फंड; सेबीकडे अर्ज दाखल

संजय पुगालिया यांच्या नियुक्तीची घोषणा करताना अदानी ग्रुपनं म्हटलं की, "अदानी समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये आणि राष्ट्र उभारणीच्या आमच्या उपक्रमांमधील मीडिया, कम्युनिकेशन आणि ब्रँडिंगमध्ये पुगालिया यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत"

Adani Group
रिलायन्स ज्वेल्सतर्फे 'बेला कलेक्शन' दागिने; नव्या डिझाइनला उत्तम प्रतिसाद

पुगालिया यांच्यावर प्रणव अदानी यांच्यासोबत काम करणार आहेत. प्रणव अदानी हे अदानी ग्रुपच्या अॅग्रो, ऑईल आणि गॅस कंपन्यांचे तसेच अदानी एन्टरप्रायझेसमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.