Adani Group : भारतातल्या सर्वात पॉवरफूल उद्योगपतीशी पंगा घेणारा 'हा' माणूस नेमका कोण?

अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Gautam Adani
Gautam Adani Sakal
Updated on

Gautam Adani vs Hindenburg : अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

या अहवालामुळे भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांना ४५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांची संपत्ती 113 अब्ज डॉलरवर आली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते 7 व्या क्रमांकावर घसरले आहेत.

हिंडेनबर्ग संशोधन कंपनी काय करते?

हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी फॉरेन्सिक आर्थिक संशोधनात तज्ञ असल्याचा दावा करते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी शेअर्स, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते.

कंपनीने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की, आर्थिक हेराफेरीशी संबंधित घोटाळे बाहेर काढते, म्हणजे कंपनीच्या कागदपत्रांमधील गडबड, कंपन्यांमध्ये सुरू असलेले गैरव्यवस्थापन आणि कंपनीचे व्यवहार, जे अनेकदा कंपन्यांकडून लपवले जातात ते उघड करण्याचे काम कंपनी करते.

नॅथन अँडरसन कोण आहेत?

नॅथन अँडरसन हे हिंडेनबर्ग संशोधनाचे संस्थापक आहेत. कनेक्टिकट विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या अँडरसनने फॅक्टसेट रिसर्च या डेटा कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

येथे त्यांचे काम गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांशी संबंधित होते. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये त्यांची शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्च सुरू केली. हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन हे यापूर्वी इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक होते. ते हॅरी मार्कोपोलोसला आपला आदर्श मानत.

हॅरी मार्कपौलोस हे विश्लेषक आहेत आणि बर्नी मॅडॉफची फसवणूक योजना उघड करण्यासाठी ओळखले जातात.

कंपनीच्या संस्थापकाच्या म्हणण्यानुसार, हिंडनबर्ग हे नाव अपघातावरून पडले आहे. 6 मे 1937 रोजी मँचेस्टर टाउनशिप, न्यू जर्सी येथे झालेल्या हिंडेनबर्ग एअरशिपच्या अपघातावरून हे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

आत्ता पर्यंत16 कंपन्यांबाबत केला खुलासा :

अदानी समूहाचा खुलासा करण्यापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चने यापूर्वी अनेक कंपन्यांबाबत असे अहवाल प्रसिद्ध केले आहेत. या अहवालांमुळे त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

2017 मध्ये लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत या फर्मने सुमारे 16 कंपन्यांमधील कथित अनियमिततेशी संबंधित मोठे खुलासे केले आहेत. या रिसर्च फर्मने ट्विटरबाबत अहवालही जारी केला होता. या अहवालाचीही जोरदार चर्चा झाली.

2020 मध्ये, त्याने निकोलाबद्दल खुलासा केला होता. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. निकोला ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी होती. कंपनीने गुंतवणूकदारांना त्यांच्या नवीन वाहनांबद्दल चुकीची माहिती देऊन फसवले, प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोणतीही वाहने नव्हती.

2016 पासून, हिंडेनबर्ग रिसर्चने असे डझनभर अहवाल प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत.

हिंडेनबर्ग कसे कार्य करते?

कोणत्याही कंपनीमध्ये गडबड आढळल्यास तपशीलवार अहवाल तयार केला जातो आणि नंतर तो प्रकाशित केला जातो. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ती स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधन करते.

ही संशोधन संस्था हिंडनबर्ग कॉर्पोरेट जगतातील सर्व गैरकृत्यांचा हिशेब ठेवते आणि नंतर या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करून पैसे कमवते.

Gautam Adani
Adani Group : अदानी शेअर्सच्या घसरणीमुळे LIC ला 18300 कोटींचा चुना, जाणून घ्या काय आहे प्रकरण

अदानी समूहाला विचारले 88 प्रश्न?

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी समूहाला 88 प्रश्न विचारले आहेत. या अहवालात अदानी समूहाला विचारण्यात आले आहे की, गौतम अदानी यांचे धाकटे बंधू राजेश अदानी यांना समूहाचे एमडी का करण्यात आले आहे, तर त्यांच्यावर कस्टम करचोरी, बनावट आयात दस्तऐवज आणि अवैध कोळसा आयात केल्याचा आरोप आहे.

हिरे व्यापार घोटाळ्यात नाव आल्यानंतरही गौतम अदानी यांचे मेहुणे समिरो व्होरा यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक का करण्यात आले, असे अनेक प्रश्न हिंडनबर्ग रिसर्च एजन्सीने अदानी समूहाला विचारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.