मुंबई : अदाणी रोड ट्रान्सपोर्ट लि. (adani transport) तर्फे महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्कचा (Maharashtra border check post network) सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर (sadbhav infrastructure) प्रोजेक्ट लि. कडील वाटा (shares) 1,680 कोटी रुपयांना घेतला जाणार आहे. यासंदर्भात नुकताच करार (agreement) झाला आहे.
अदाणी रोड ट्रान्सपोर्ट लि. ही अदाणी एंटरप्रायझेस ची उपकंपनी आहे. त्यांच्यातर्फे देशभर रस्ते व महामार्ग निर्माण करणे, विकसित करणे, त्यांचे संचालन आणि व्यवस्थापन करणे अशी कामे केली जातात. त्यांच्यातर्फे सुरुवातीला महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट चा 49 टक्के वाटा खरेदी केला जाईल. नंतर नियामकांच्या मान्यतेच्या अधीन राहून आणखी जादा वाटाही घेतला जाईल.
देशाच्या आर्थिक विकासात उत्तम रस्तेबांधणी हा महत्वाचा घटक असून या क्षेत्रात भारताने मोठीच प्रगती केली आहे, असे अदाणी रोड ट्रान्सपोर्ट चे सीईओ कृष्ण प्रकाश महेश्वरी म्हणाले. अदाणी ग्रूप ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी असून रस्त्यांचे सर्वातमोठे जाळे उभारण्याचा त्यांचा मानस आहे. यावर्षीच्या ऑक्टोबरनंतर हा सर्व व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बॉर्डरचेकपोस्ट कडे राज्याच्या सीमेवरील 24 चेकपोस्टवरील शुल्कआकारणीचे अधिकार आहेत. हे अधिकार सन 2033 पर्यंत आहेत. या चेकपोस्टवरून महाराष्ट्राला अन्य सहा राज्यांशी जोडले जाते. या मार्गांवरून देशातील एकूण व्यापारी वाहतुकीपैकी साधारण वीस टक्के वाहतूक होते. यापैकी 18 चेकपोस्ट पूर्णपणे कार्यरत आहेत तर उरलेले चेकपोस्ट कार्यरत होण्याच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.