नियमांच्या पालनाने वाढेल स्टार्टअपचे आरोग्य

Startup
Startup
Updated on

एक उद्योजक म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांच्या पालनाकडे आपण वेळखाऊ किंवा त्रासदायक काम म्हणून न पाहता आरोग्याची आपण नियमित तपासणी करून घेतो तशा दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. नियमित आरोग्य तपासणी, नियमित व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी, यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते, तशाच प्रकारे स्टार्टअप्सनीही सर्व नियमांचे वेळेत आणि काटेकोरपणे पालन केले पाहिजे; ज्यामुळे तिचे आरोग्य उत्तम राहील.

नियमितपणे अंतर्गत लेखापरीक्षण
बहुतांश वेळा स्टार्टअप्स या अनुभव नसलेल्या आणि उद्योगाचे पहिलेच पाऊल टाकणाऱ्या उद्योजकांकडून चालवल्या जात असल्यामुळे अकाऊंटिंगच्या प्रक्रियेत काही चुका होण्याचा संभव असतो. त्यामुळे व्यावसायिक ऑडिटरची नेमणूक करून या प्रक्रियांचा नियमितपणे आढावा घेणे आणि चुका दुरुस्त करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. काही चुका नंतर खूप तापदायक सिद्ध होऊ शकतात आणि नंतर मोठे दंड भरावे लागू शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

इंटर्नल ऑडिट्समुळे (अंतर्गत लेखापरीक्षण) स्टार्टअपला तिच्या खर्चांचाही आढावा घेता येऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या ती कोणत्या टप्प्यावर आहे हे बघता येऊ शकते. संस्थापकांना ते उपयोगी पडते आणि गुंतवणुकांसह इतर परिणामकारक निर्णयांसाठी ही गोष्ट खूप उपयुक्त ठरते.

आपण जनरल चेकअपसाठी फॅमिली डॉक्टरकडे जातो, त्याच प्रकारे या इंटर्नल ऑडिटकडे बघा. ते कदाचित बंधनकारक नसेल आणि तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या कदाचित जाणवतही नसतील; पण डॉक्टरांकडे नियमित जाण्यामुळे काही वेळा काही आरोग्यविषयक समस्यांचे निदान आधीच होते आणि त्यावर परिणामकारक आणि जलदपणे उपचार करणे शक्य होते.

इंटर्नल ऑडिट्समुळे अनेक त्रुटी आधीच लक्षात येतात आणि ही समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याआधीच तिचे निराकरण करता येते. याचबरोबर तुम्ही नियमांचे काटेकोर पालन करायला किती महत्त्व देता हे संभाव्य गुंतवणूकदारांना दाखवून देण्यासाठीही हे ऑडिट उपयोगी पडते.

व्हर्च्युअल/पार्ट-टाइम सीएफओ नेमा
प्राथमिक टप्प्यावरच्या स्टार्टअप्सना पूर्णवेळेचे सीएफओ म्हणजे मुख्य वित्त अधिकारी नेमणे परवडणे शक्य नसले, तरी पार्ट-टाइम म्हणजे अर्धवेळ सीएफओ तुम्ही नेमू शकता किंवा अगदी कमी खर्चात व्हर्च्युअल सीएफओ सर्व्हिस प्रोव्हायडरची सेवा घेऊ शकता.

Good News : सोने ५० हजारांच्या खाली; पाच हजारांनी वधारण्याची शक्यता कायम
    
व्यावसायिक सीएफओ स्टार्टअप्सच्या संस्थापकांना स्टार्टअपची आर्थिक शिस्त राखणे, त्यांच्याकडे येणाऱ्या पैशांचा ट्रॅक ठेवणे, डेटावर आधारित निर्णय घेणे आदींसाठी मदत करतात. ज्या ठिकाणी संस्थापकांना आर्थिक अनुभव किंवा पार्श्वभूमी नसते, त्यांच्यासाठी आर्थिक तज्ज्ञ म्हणूनही हे सीएफओ भूमिका बजावतात. जिममध्ये पर्सनल ट्रेनर असतात, तशाच प्रकारे तुम्ही सीएफओंच्या सेवेकडे बघा. फिटनेसची तुमची उद्दिष्टे फार मोठी नसतील किंवा तुमच्याकडे व्यायाम आणि फिटनेसबाबत आधीपासूनच अनुभव असेल, किंवा तुमचा प्लॅन किंवा शेड्युल काटेकोरपणे पाळण्याची शिस्त  
    
तुमच्याकडे असेल, तर अशा वेळी पर्सनल ट्रेनरची गरज असेलच असे नाही. मात्र, या गोष्टी तुमच्याकडे नसल्या आणि तुमचे उद्दिष्ट मात्र मोठे असेल, तर पर्सनल ट्रेनरची तुम्हाला नितांत आवश्यकता असते.
स्टार्टअप इंडिया रेकग्निशन
ज्या स्टार्टअप्सची स्थापना १ एप्रिल २०१६ ते १ एप्रिल २०२१ या काळात झाली असेल, त्यांनी स्टार्टअप इंडिया रेकग्निशन मिळवणे अतिशय उपयुक्त आहे- कारण त्यामुळे करविषयक फायदे मिळू शकतात.
    
अर्थात, करविषयक फायदे मिळवण्यासाठी औद्योगिक धोरण आणि प्रसार खात्यामार्फत (डिआयपीपी) स्टार्टअप इंडिया प्रमाणपत्र मिळवणे एवढेच पुरेसे नसते. तुम्हाला डीआयपीपीने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालय मंडळाकडेही (आयएमबी) अर्ज करणे आवश्यक असते. 
तुम्ही डीआयपीपीने तयार केलेली वेबसाइट किंवा मोबाईल ऍप यांच्यामार्फत अर्ज करू शकता. तुम्हाला अर्जाबरोबर या गोष्टी सबमिट कराव्या लागतील - 

सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन
तुमच्या उद्योगाविषयी आणि तो नावीन्य, विकास, उत्पादन सुधारणा, प्रक्रिया किंवा सेवा किंवा रोजगारनिर्मिती किंवा संपत्ती निर्मितीविषयी कशा प्रकारे काम करतो त्याविषयी राइटअप.
 
डीआयपीपी तुम्हाला काही अतिरिक्त माहिती किंवा काही अतिरिक्त कागदपत्रे मागू शकते आणि सर्व गोष्टी विचारात घेऊन, योग्य कारणांसहित तुमचा अर्ज स्वीकारू किंवा नाकारू शकते. आयएमबीचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तुम्हाला हे करविषयक फायदे मिळू शकतात :

  • सात वर्षांच्या काळात तीन वर्षांचा टॅक्स हॉलिडे
  • लॉंग-टर्म कॅपिटल गेन्सपासून (काही अटींवर) सवलत
  • फेअर मार्केट व्हॅल्यूवरच्या गुंतवणुकांवर करसवलत (म्हणजे उच्च व्हॅल्यूवर एंजल इन्व्हेस्टमेंट्सवर कर नाही)
  • स्टार्टअपच्या इक्विटी शेअर्समध्ये लॉंग-टर्म कॅपिटल गेनवर वैयक्तिक/ एचयूएफला करसवलत
  • शेअरहोल्डिंग पॅटर्न बदलल्यास कॅरी फॉरवर्ड लॉसेस किंवा कॅपिटल गेन्स सेट ऑफ करण्यास मुभा

कंपनी सेक्रेटरी असलेली सीए फर्म
तुमच्या स्टार्टअपसाठी चार्टर्ड अकाउंटंटची नेमणूक करत असताना, त्या कंपनीच्या पेरोलवर कंपनी सेक्रेटरीसुद्धा असेल याची खातरजमा करून घ्या. त्यामुळे अनेक व्यक्तींची नेमणूक करण्याचा तुमचा त्रास वाचेल आणि एकच कंपनी आरओसी/रजिस्ट्रारविषयक नियमांचे आणि करविषयक नियमांचेही पालन करण्याची काळजी घेईल.

विवरणपत्रे भरण्यात दिरंगाई नको
लशी किंवा विशिष्ट औषधे ही वेळेतच द्यावीत लागतात आणि त्यांच्यात उशीर झाला, तर काही गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, तशाच प्रकारे करविषयक विवरणपत्रे हीसुद्धा नियमितपणे आणि विशिष्ट कालमर्यादेत भरावी लागतात. त्यात दिरंगाई झाली, तर त्यामुळे व्याज, दंड आणि इतर अनेक गोष्टी भराव्या लागतात. संस्थापकांनी ही काही विवरणपत्रे आपल्याला सादर करावी लागतात हे लक्षात ठेवावे:

  • प्राप्तिकर विवरणपत्रे सादर करणे – (वार्षिक- सर्वसाधारणपणे सप्टेंबरमध्ये)
  • कर लेखापरीक्षण अहवाल (टॅक्स ऑडिट रिपोर्ट) 
  • सादर करणे – (वार्षिक- सर्वसाधारणपणे सप्टेंबरमध्ये) 
  • मासिक/तिमाही जीएसटी विवरणपत्रे सादर करणे – सर्वसाधारणपणे दर महिन्याची वीस तारीख
  • तिमाही टीडीएस विवरणपत्रे – सर्वसाधारणपणे त्या तिमाहीपुढील महिनाअखेरीस
  • वैधानिक लेखापरीक्षण – वार्षिक (सर्वसाधारणपणे एप्रिल ते सप्टेंबर)
  • संचालक मंडळाच्या बैठका आणि वार्षिक सर्वसाधारण सभा (दर वर्षी संचालक मंडळाच्या किमान चार बैठका

स्टार्टअप ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवली जात असल्यास तिला विविध नियामक संस्थांच्या नियमावलींचे पालन करावे लागते. कर आणि इतर विवरणपत्रे नियमित भरणे, संचालक मंडळाच्या आणि इतर बैठकांचे आयोजन करणे, वैधानिक खाती मेंटेन करणे याबरोबरच इतर अनेक गोष्टींचे पालन करावे लागते. या लेखात आपण अशाच काही नियमांची माहिती घेणार आहोत. संस्थापक म्हणून तुम्हाला ते माहीत असायला हवेत- ज्यामुळे तुमच्या कंपनीचे आरोग्य उत्तम राहील.

तुम्ही एखाद्या स्टार्टअपचे संस्थापक आहात आणि तुम्हाला नियामक संस्था आणि नियमावलींच्या प्रक्रियेबाबत मदत हवी आहे, तर तुम्ही आम्हाला info@dcfventures.in या पत्त्यावर संपर्क साधू शकता. आम्ही आमच्या सहयोगींना तुमच्याशी जोडून देऊ आणि तुम्हाला लगेच मदत मिळेल याची व्यवस्था करू. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.