Aditya Birla Fashion and Retail Shares : शेअर बाजारात सगळ्यांना कमी काळात मोठा नफा कमवायचा असतो, पण शेअर बाजारात संयम ही महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. लाँग टर्ममध्ये शेअर्स जितका रिटर्न देतात तितका कमी वेळेत मिळेल असं नाही. अशात आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. आता तर सध्याच्या पातळीपेक्षा शेअर्स सुमारे 22.5% वाढू शकतात असा विश्वास शेअर मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने नुकत्याच दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे. आदित्य बिर्ला फॅशनने 8 लाइफस्टाइल ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला जे संपूर्णपणे डिजिटल चॅनेलद्वारे व्यवसाय करतात. डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) सेगमेंटमध्ये कंपनीची ही पहिली गुंतवणूक आहे आणि येत्या काही वर्षांत कंपनीला मोठा परतावा मिळेल. आदित्य बिर्ला यांनी आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 21,000 कोटी रुपयांची कंपनी बनण्याचे टारगेट ठेवले आहे.
आदित्य बिर्ला फॅशनच्या स्टॉकवर 380 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग कायम ठेवल्याचे आयसीआयसीआय डायरेक्टने सांगितले आहे. शिवाय ऍक्सिस डायरेक्टनेही या स्टॉकवर बाय रेटिंग कायम ठेवताना, 400 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. आदित्य बिर्ला फॅशनचा शेअर मंगळवारी एनएसईवर 0.72 टक्क्यांनी घसरून 309.85 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 12.45% ने घसरण झाली आहे. त्याचवेळी या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याचे शेअर्स सुमारे 13.25% वाढले आहेत.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल ही कंपनी आदित्य बिर्ला ग्रुपच्या मालकीची आहे. ऍलन सोली, व्हॅन ह्यूसेन, लुई फिलिप आणि पीटर इंग्लंड यांसारख्या अनेक प्रमुख फॅशन आणि पोशाख ब्रँडचे ते मालक आहेत. याशिवाय, कंपनीकडे 'पँटालून्स' आहे, जो देशातील सर्वात मोठ्या फॅशन स्टोअर ब्रँडपैकी एक आहे. आदित्य बिर्ला फॅशनचे देशातील 900 हून अधिक शहरांमध्ये सुमारे 3,468 स्टोअरचे मजबूत नेटवर्क आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.