सीएनएएक्स ब्रँड कंपनी डीएफएम फूड्सचे (DFM Foods) मालक आणि प्रमोटर, प्रायव्हेट इक्विटी कंपनी अॅडव्हेंट इंटरनॅशनल (Advent International) कंपनीचे शेअर्स एक्स्चेंजमधून काढून टाकण्याची योजना आखत आहेत. याच बातमीचा कंपनीच्या शेअरवर मोठा परिणाम झाला. बीएसईवर डीएफएम फूड्सचे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत वाढले. गुरुवारी दुपारी कंपनीचा शेअर सुमारे 13 टक्क्यांनी वाढून 297 रुपयांवर व्यवहार करत होता, जो एका महिन्यातील उच्चांक आहे. या शेअरने इंट्राडेमध्ये 314.25 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला (All Time High) स्पर्श केला. गेल्या वर्षभराबाबत बोलायचे झाले तर हा शेअर सुमारे 19 टक्क्यांनी घसरला आहे.
स्नॅक्स कंपनी DFM फूड्सचा शेअर अजूनही त्याच किमतीवर आहे ज्या किंमतीला तो 2019 मध्ये खासगी इक्विटी कंपनीने विकत घेतला होता. अॅडव्हेंट इंटरनॅशनलने डीएफएम फूड्समधील बहुतांश भागभांडवल 249.50 रुपये प्रति शेअरने विकत घेतले होते. त्यांची कंपनीत सध्या 73.70 टक्के हिस्सेदारी आहे.
डिलिस्टिंगबाबत अॅडव्हेंट इंटरनॅशनलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अॅडव्हेंट इंटरनॅशनल डीएफएम फूड्सला डीलिस्टिंग करण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यामुळे कंपनीच्या कामगिरीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.