फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) धोरणाच्या घोषणेनंतर, देशांतर्गत बाजाराने गुरुवारी चांगले कमबॅक केले. अखेर चार दिवसांच्या घसरणीतून शेअर बाजार सावरला. फेडरल रिझर्व्हने अपेक्षेपेक्षा वेगाने व्याजदर वाढवण्याचे आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाँड खरेदी थांबवण्याचे संकेत दिलेत. यामुळेच बाजारात 4 दिवसानंतर उत्साहाचे वातावरण दिसले.
देशांतर्गत बाजार प्री-ओपनपासून (Pre-Open) मजबूत राहिला. बाजार उघडल्यानंतरही तेजी कायम राहिली. BSE सेन्सेक्सने सुमारे 400 अंकांच्या मजबूत वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली. बाजार उघडताना NSE निफ्टी 17,350 अंकांच्या वर राहिला. बीएसई सेन्सेक्स 0.21 टक्क्यांनी वाढून 57,910.12 अंकांवर बंद झाला. NSE निफ्टीही 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 17,264 अंकांवर बंद झाला.