Airtel-TCS स्ट्रॅटेजिक पार्टनर, 5G सर्विसच्या दृष्टीने मोठी पावलं...

5G
5Gsakal
Updated on

भारती एअरटेलने (Bharti Airtel) 5G सेवा सुरू करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. एअरटेलने टाटा ग्रुप (Tata group) ची कंपनी टीसीएस (TCS) सोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप केली आहे. ही पार्टनरशीप 5G नेटवर्क सोल्यूशनसाठी झाली आहे. यात टीसीएसने एअरटेलसाठी 5 जी नेटवर्क सोल्यूशन विकसित केले आहे, जे पूर्णपणे स्वदेशी आहे. एअरटेल 5G टेक्नोलॉजी ची सुरुवात जानेवारी 2022 पासून सुरू करेल. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट म्हणून केले जाईल. (Bharti Airtel, TCS announce collaboration to build 5G networks in India)

5G
'हे' हेवीवेट शेअर्स पुढेही देणार तगडा परतावा, ब्रोकर हाऊसेसने सुचवलेले शेअर्स

TCS ने नवीन तंत्रज्ञान विकसित केले

टीसीएसने O-RAN (ओपन रेडिओ एक्सेस नेटवर्क) आधारित रेडिओ आणि NSA / SA (नॉन-स्टँडअलोन / स्टँडअलोन) कोर विकसित केला आहे. हे पूर्णपणे स्वदेशीरित्या डेव्हलप केलेले सोल्युशन आहे. टीसीएसकडे ग्लोबल सिस्टम इंटीग्रेशन आणि 5G साठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 3 GPP आणि O-RAN या दोन्हीसाठी एंड-टू-एंड सोल्यूशन उपलब्ध करतात.

ग्लोबल स्टँडर्ड

भारत सरकारने ठरवलेल्या नियमांनुसार, जानेवारी 2022 पासून, एअरटेल या टीसीएस सोल्यूशनचा उपयोग भारतात 5 G सेवा सुरू करण्यासाठी करू शकेल. पायलट प्रोजेक्टपासून याची सुरूवात होईल. हा प्रोजेक्ट मेड इन इंडिया 5 G प्रॉडक्ट आणि सोल्यूशन्स ग्लोबल स्टँडर्डच्या अनुषंगाने आहेत.

5G
नव्या PNG गॅस स्टोव्हमुळे बिलात होईल 25 टक्के बचत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.