Amazon ला मोठा झटका! एक ट्रिलियन डॉलरचा झाला तोटा; वाचा काय आहे कारण

ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.
amazon
amazonsakal
Updated on

ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीने 1 ट्रिलियन डॉलर गमावले आहेत. सप्टेंबर 2022 च्या अखेरीस फ्लिपकार्टला 3.7 बिलियन डॉलर म्हणजेच 30,000 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. एवढा मोठा तोटा होण्याचे कारण म्हणजे शेअर बाजारातील बदललेली परिस्थिती.

बुधवारी ॲमेझॉन ई-कॉमर्स कंपनीचे शेअर्स 4.3 टक्क्यांनी घसरले, त्यानंतर कंपनीचे बाजार मूल्य 879 अब्ज डॉलर झाले. जे जुलै 2021 पर्यंत 1.88 ट्रिलियन डॉलरच्या जवळ होते. याचा अर्थ वर्षभरात कंपनीचे बाजार मूल्य 1 ट्रिलियन डॉलरपेक्षा कमी झाले आहे.

हेही वाचा : कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपन्यांच्या वाढीमध्ये तीव्र मंदी दिसत आहे. कमी विक्री, वाढता खर्च आणि व्याजदरात झालेली वाढ यामुळे कंपन्यांचे शेअर्स जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, वर्षाच्या सुरुवातीपासून सह-संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती सुमारे 109 अब्ज डॉलर इतकी कमी झाली आहे. Amazon कंपनीची बाजारातील किंमत 1 ट्रिलियन डॉलरच्या खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

amazon
Foldable Laptop : कमी किंमतीचा फोल्डेबल लॅपटॉप भारतात लॉन्च; जाणून घ्या खास फीचर्स

जुलै 2021 मध्ये, फ्लिपकार्टकडे 1 अब्ज डॉलर रोख होती, जी सप्टेंबर 2022 पर्यंत घसरून 887 दशलक्ष डॉलर झाली. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टच्या नियामक फाइलिंगनुसार, कंपनीने जुलै 2021 मध्ये 3.6 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 29,000 कोटी रुपये उभारले होते.  जे नंतर तोट्यात गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()