Amazon Layoffs : भारतालाही आर्थिक मंदीची फटका! अ‍ॅमेझॉन 1000 जणांना नोकरीहून काढणार

amazon layoffs amazon will lay off 1 percent of its workforce about 1000 employees in india
amazon layoffs amazon will lay off 1 percent of its workforce about 1000 employees in india esakal
Updated on

जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. ही अमेरिकन कंपनी जगभरातील कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे आणि भारतातील नोकर कपात देखील त्याचाच एक भाग आहे.

अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे कंपनी जगभरात 18,000 हून अधिक पदांवररील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. जागतिक स्तरावर 18,000 पदांवरून लोकांना काढून टाकण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा देशातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अन्य एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉनचे भारतात एक लाख कर्मचारी काम करत आहेत. या निर्णयामुळे भारतात काम करणाऱ्या Amazon च्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 1 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.

मात्र, याबाबत विचारले असता अ‍ॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जेसी यांच्या आर्टिकलची लिंक शेअर केली आहे. या आर्टिकलमध्ये त्यांनी कंपनीच्या जागतिक स्तरावर 18,000 पदे संपवण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

amazon layoffs amazon will lay off 1 percent of its workforce about 1000 employees in india
Paternity Leave Policy : वडिलांनाही मिळणार बाळंतपणाची रजा! प्रसिध्द कंपनीचा मोठा निर्णय

कोणावर परिणाम होईल

जेसी यांनी सांगितले की, आम्ही सुमारे 18,000 पोस्ट काढून टाकण्याची योजना आखत आहोत. या निर्णयाचा फटका अनेक गटांना बसणार आहे. तथापि, बहुतेक पदे Amazon Store आणि PXT (People, Experience and Technology) संस्थेशी संबंधित आहेत.

Amazon द्वारे 18,000 कर्मचार्‍यांची हकालपट्टी ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोकर कपात मानली जात आहे. याआधी अशी बातमी आली होती की कंपनी आपल्या 17,000 कर्मचार्‍यांची छाटणी करणार आहे, जी नंतर 18,000 करण्यात आली.

amazon layoffs amazon will lay off 1 percent of its workforce about 1000 employees in india
ChatGPT News : पोरांचा गृहपाठही करतंय ChatGPT; अखेर शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.