Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनचा कर्मचाऱ्यांना धक्का! आणखी 2,300 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Amazon ने बुधवारी वॉशिंग्टनमध्ये रोजगार सुरक्षा विभागाकडे नोटीस दाखल केली आहे
Amazon
Amazonesakal
Updated on

Amazon Layoff : जगात मंदीच्या भीतीने, मोठ्या संख्येने कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आयटी क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत.

ट्विटर ते फेसबुक, टीसीएस आणि गुगल सारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अलीकडेच, Amazon ने आपल्या 18000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.

आता पुन्हा Amazon ने बुधवारी वॉशिंग्टनमध्ये रोजगार सुरक्षा विभागाकडे दाखल केलेल्या नोटीसनुसार, अॅमेझॉनच्या नवीन फेरीचा भाग म्हणून सिएटल प्रदेशातील किमान 2,300 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, सिएटलमधील 1,852 नोकर्‍या आणि वॉशिंग्टनमधील बेलेव्ह्यूमधील आणखी 448 कर्मचारी कपात केली जात आहेत. कंपनीने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर अंदाजे 18,000 कॉर्पोरेट आणि टेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Seattletimes.com मधील अहवालानुसार, 60-दिवसांच्या संक्रमणकालीन कालावधीनंतर, 19 मार्चपासून कर्मचारी कपात सुरू होईल. Amazon कर्मचार्‍यांना पगार देणे सुरू ठेवेल परंतु त्यांच्याकडून काम करण्याची अपेक्षा नाही. असे कंपनीने म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टने बुधवारी जाहीर केले की, ते सुमारे 10,000 नोकर्‍या कमी करत आहेत आणि त्याच्या सीईओने असे भाकीत केले आहे की, टेक उद्योगाला आणखीन दोन वर्षे कठीण जाणार आहेत.

Amazon
Adani Group News : अदानी समूहाचा काँग्रेसशासित सरकारसोबत मोठा करार; 'या' कंपनीतील 50% हिस्सा...

नोव्हेंबरमध्ये, अॅमेझॉनने टाळेबंदीची पहिली फेरी सुरू केली. त्यावेळी, असे अहवाल आले होते की, सुमारे 10,000 कर्मचारी प्रभावित होतील, ज्यामध्ये हार्डवेअर आणि सेवा, मानव संसाधन विभागातील कर्मचारी आहेत.

Amazon च्या या कपातीमुळे 18,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या सीईओ अँडी जस्सीच्या मेमोने घोषित केले की, प्रभावित कर्मचार्‍यांना 18 तारखेपासून सूचित केले जाईल.

मेटा, स्नॅप, डोरडॅश आणि अर्थातच मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्या 2022 आणि 2023 मध्ये हजारो कर्मचारी काढून टाकण्याची योजना करत असल्याची घोषणा करत आहेत.

CNBC आणि TrueUp च्या टेक लेऑफ ट्रॅकरच्या अह्वालानुसार, टेक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात सुमारे 60,000 कामगारांना कामावरून काढून टाकले आहे, तर 2022 पासून पूर्ण औद्योगिक क्षेत्रात जवळपास 3, 00,000 कामगारांना कामावरून कमी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.