EMI च्या 10 टक्के गुंतवणूक; 20 वर्षांत गृहकर्जाचा खर्च वसूल

Home Loan
Home LoanSakal
Updated on
Summary

प्रत्येक नोकरी करणारी व्यक्ती कधी ना कधी गृहकर्ज घेण्याचा विचार करतेच.

गृहकर्ज आता प्रत्येकाजवळच आहे आणि ती गरजही आहे. पण कधी विचार केला आहे का? की तुम्ही बँकेला गृहकर्जाच्या मोबदल्यात नेमके किती पैसे चुकवता. थोडं कॅलक्युलेशन केलं तर लक्षात येईल तुम्ही बँकेला घेतलेल्या गृहकर्जाच्या तब्बल दुप्पट पैसे देता.

Home Loan
पथारी व्यावसायिकांना २० हजारांपर्यंत कर्ज

प्रत्येक नोकरी करणारी व्यक्ती कधी ना कधी गृहकर्ज घेण्याचा विचार करतेच. पण तुम्ही गृहकर्जाच्या बदल्यात बँकेला तब्बल दुप्पट रक्कम देता हे तुम्हाला ठाऊक आहे का? 25 ते 30 लाखांच्या कर्जावर तुम्ही बँकेला किती पैसे देता माहितेय ? तुम्ही बँकेला जे व्याज देता ते तुमच्या गृहकर्जापेक्षाही जास्त असते. पण तुम्ही स्मार्ट इनव्हेस्टर असाल तर हे नुकसान भरून काढू शकता. यासाठी तुमच्या मदतीला येईल म्युच्युअल फंडमधील सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP). गृह कर्जाचा हफ्ता सुरू झाल्यावर तुमच्या कर्जाच्या 10 टक्के रक्कम तुम्ही SIP मध्ये गुंतवली तर तुम्ही गृहकर्जाचा सगळा खर्च परत मिळवू शकता. कसे ते पाहुयात.

Home Loan
फ्लिपकार्ट होलसेल देत आहे 2 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज

30 लाख रुपयांचे गृहकर्ज (Home Loan)

- एकूण कर्जाची रक्कम : 30 लाख रुपये

- ईएमआय (EMI) साठीचा कालावधी : 25 वर्ष

- व्याज दर : 6.75 टक्के (SBI)

- प्रति महिन्याचा ईएमआय (EMI) : 20,727 रुपये

- एकूण व्याज : 32,18,204 रुपये

- एकूण रक्कम: 62,18,204 रुपये

इथे 30 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तुम्ही 25 वर्षात जवळपास 62 लाख रुपये भरत आहात. जी रक्कम तुमच्या कर्जाच्या रक्कमेच्या दुप्पट आहे.

Home Loan
परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्प; SBI देतंय कमी दरात कर्ज

ईएमआय (EMI)सोबतच सुरू करा एसआयपी (SIP)

- महिन्याची SIP: 2000 रुपये (EMI चे 10 टक्के)

- SIP साठीचा कालावधी : 25 वर्ष

- अंदाजे परतावा (Return) : वार्षिक 15 टक्के

- गुंतवलेली एकूण रक्कम : 6 लाख रुपये

-SIP ची एकूण किंमत : 65.7 लाख रुपये

Home Loan
सहकारी बँकांच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ

गृह कर्ज पुन्हा परत

इथे तुम्ही 30 लाख कर्जाच्या बदल्यात 25 वर्षात जवळपास 62 लाख रुपये बँकेला देत आहात. तेच या 25 वर्षात SIP मध्ये केवळ 6 लाख गुंतवणूक केल्याने तुम्हाला थेट 66 लाख रुपये मिळतात, म्हणजे तुमचे नुकसान थेट शून्यावर येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()