केवळ 6 महिन्यांत 1 लाखाचे 7.5 लाख, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

केवळ 6 महिन्यांत 1 लाखाचे 7.5 लाख, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
Updated on

- शिल्पा गुजर

तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय, एएनजी लाइफसायन्सच्या (ANG Lifesciences) शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक तब्बल 650 टक्क्यांनी वाढला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची गुंतवणूक 7.50 लाख रुपये झाली असती.

केवळ 6 महिन्यांत 1 लाखाचे 7.5 लाख, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
रेकॉर्डब्रेक लसीकरणाने एका पक्षाला ताप; PM मोदींचा काँग्रेसला टोला

देशांतर्गत शेअर बाजार शुक्रवारी अर्थात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरला. बीएसई सेन्सेक्स 125 अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदारांचे 1.7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. पण शेअर बाजारात या वर्षीच्या तेजीमुळे अनेक शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक बनले आहेत. यापैकी एक नाव एएनजी लाइफसायन्सचे (ANG Lifesciences) देखील आहे. या फार्मास्युटिकल कंपनीचा स्टॉकमध्ये गेल्या 6 महिन्यांत चक्क 650 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

शुक्रवारी हा शेअर बीएसईवर 4.99 टक्क्यांनी घसरून 642.10 रुपयांवर बंद झाला. पण अलीकडेच हा स्टॉक 744.70 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. 6 महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत फक्त 85.50 रुपये होती. गेल्या एका महिन्यात हा शेअर 527 रुपये प्रति शेअर वरून 642.10 रुपयांच्या पातळीवर गेगला. या काळात त्यात सुमारे 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 85.50 रुपयांवरून 642.10 रुपयांवर गेला आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 650 टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे.

केवळ 6 महिन्यांत 1 लाखाचे 7.5 लाख, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
Aadhaar Pan Link : आधार-पॅनकार्ड लिंक करण्याची पुन्हा मुदतवाढ!

गुंतवणूकदारांनी किती कमावले

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी एएनजी लाइफसाइंसेज (ANG Lifesciences) या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य 1.22 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 महिन्यांपूर्वी एएनजी लाइफसाइंसेजमध्ये (ANG Lifesciences) 1 लाख गुंतवले असते तर त्याचे मूल्य 3.56 लाख रुपयांपर्यंत पोहोचले असते. 16 जून रोजी या शेअरची किंमत 180.35 रुपये होती. या काळात हा स्टॉक सुमारे 3.56 पट अधिक वाढला. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य 7.50 लाख रुपये झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.