'व्हेरी स्मार्ट इन्व्हेस्टर' होण्यासाठी पाच पायऱ्या

आर्थिक बाबींच्या व्यवस्थापनापासून ते किराणा मालाची ऑर्डर देण्यापर्यंत आणि मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध करून घेणे, समाजात मिसळणे यांपासून ते नेटवर्किंगपर्यंत, सर्व काही जोडलेले आहे आणि बटनाला केवळ एक स्पर्श केल्यानंतर हे शक्य होते
'व्हेरी स्मार्ट इन्व्हेस्टर' होण्यासाठी पाच पायऱ्या
'व्हेरी स्मार्ट इन्व्हेस्टर' होण्यासाठी पाच पायऱ्याsakal media
Updated on

तंत्रज्ञानाने सर्वांना त्यांच्या आजुबाजूच्या गोष्टींशी जोडले आहे. आर्थिक बाबींच्या व्यवस्थापनापासून ते किराणा मालाची ऑर्डर देण्यापर्यंत आणि मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध करून घेणे, समाजात मिसळणे यांपासून ते नेटवर्किंगपर्यंत, सर्व काही जोडलेले आहे आणि बटनाला केवळ एक स्पर्श केल्यानंतर हे शक्य होते. स्मार्ट फोन्सपासून ते स्मार्ट होम्स आणि स्मार्ट टीव्हींपर्यंत कितीतरी उत्पादनांचा समावेश 'स्मार्ट' विभागात होतो. तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे जग अधिक स्मार्ट झाले आहे. लोकांना डिजिटल प्राविण्यांचा परिचय तर झालाच आहे, शिवाय उपलब्ध प्लॅटफॉर्म्स आपल्या लाभासाठी कसा उपयोगात आणायचा याविषयीही ते जागरूक आहेत. अर्थात, स्मार्ट हा शब्द गुंतवणूकदारांसाठी वापरला जातो, तेव्हा त्याचा अर्थ काहीसा बदलतो. स्मार्ट गोष्टींच्या तुलनेत स्मार्ट गुंतवणूकदार ही संकल्पना समजून घेणे खूपच वेगळे आहे.

तेव्हा, स्मार्ट गुंतवणूकदार कोण असतो? स्मार्ट गुंतवणूकदार म्हणजे ज्याला एका रात्रीत भरपूर पैसा कसा कमवायचा ते माहीत असते तो नाही. त्यापेक्षा, जो सातत्याने गुंतवणूक करत राहण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा उपयोग करू शकतो, ज्याच्याकडे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असतो आणि जो दीर्घकाळात संपत्तीचा संचय करतो. तो स्मार्ट गुंतवणूकदार. आणखी एक मुद्दा म्हणजे, सगळे जण जेथे पैसा गुंतवत आहेत, तेथे स्मार्ट गुंतवणूकदार गुंतवत नाहीत. त्याऐवजी ते बाजाराबद्दल जाणून घेतात आणि कशातही पैसा गुंतवण्यापूर्वी बरेच संशोधन करतात. आता या पद्धतीने स्मार्ट गुंतवणूकदार होता येते. पण तुम्हाला अधिक स्मार्ट गुंतवणूकदार कसे होता येईल? कोणतीही स्मार्ट गोष्ट जशी तंत्रज्ञानाला जोडलेली आहे. तसे तुम्हीही तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन 'व्हेरी स्मार्ट' गुंतवणूकदार होऊ शकाल.

  • पहिली पायरी म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर स्टॉकब्रोकिंगचे अॅप डाउनलोड करणे होय. तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल, तर तुम्ही तुमचा गुंतवणूक प्रवास अॅपवर झटपट अकाउंट उघडून करू शकता आणि किमान ब्रोकरेज शुल्कासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. गुंतवणूक आणि ट्रेडिंगसाठी मोबाइल अॅप वापरण्याचा फायदा म्हणजे तुम्ही येता-जाता बाजाराचा माग ठेवू शकता.

  • एकदा अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही एखाद्या रुल-बेस्ड इन्व्हेस्टमेंट इंजिनसारखे डिजिटल सोल्युशन वापरून बघू शकता आणि त्याद्वारे तुमची पहिली गुंतवणूक करू शकता. रुम-बेस्ड इन्व्हेस्टमेंट इंजिन काही नियमांच्या आधारे स्टॉक्सची शिफारस करते. यात मानवी पूर्वग्रह टाळले जातात. यामुळे जोखीम किमान पातळीवर राहते आणि मोबदला जास्तीत जास्त मिळवता येतो..

  • अत्यंत स्मार्ट गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने चढण्याची तिसरी पायरी म्हणजे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ उभा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजार पैसा गुंतवण्यासाठी डिजिटल ब्रोकर्स ब्रोकिंग अॅप्सशी एकात्मीकरण करता येईल असा वेगळा थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वापरणे होय. आधुनिक गुंतवणूक उत्पादने तुम्हाला कमी खर्चातील, दीर्घकालीन पोर्टफोलिओ तयार करण्याची मुभा देतात. इक्विटीजमध्ये गुंतवणूक करण्याच्या सर्वोत्तम मार्गापैकी हा एक आहे.

  • स्टॉकन्नोकिंग अॅप्स वापरण्याचा आणखी एक लाभ म्हणजे बाजाराबाबत सातत्याने दक्ष राहता येते. दररोजच्या कामांमध्ये बाजाराचा माग ठेवणे आव्हानात्मक होऊ शकते पण अॅपद्वारे महत्त्वाच्या घटनांचे अॅलर्टस् (इशारे) प्राप्त होत असतील, तर तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय करण्यात मदत होऊ शकते. अॅलर्टसचा वापर चातुर्याने केला, तर ते तुम्हाला अद्ययावत ठेवून नफा कमावण्यात मदत करू शकतात.

  • अखेरची पायरी म्हणजे डिजिटल ब्रोकर्स गुंतवणुकीचे शिक्षण देणारे प्लॅटफॉर्म्सही पुरवतात. हे प्लॅटफॉर्म्स म्हणजे वित्तीय बाजारांबद्दलचे सर्वसमावेशक मार्गदर्शन असते. नव्याने गुंतवणूक करायला लागलेल्यांपासून ते प्रस्थापित गुंतवणूकदारांपर्यंत कोणीही या प्लॅटफॉर्मवर जॉइन होऊ शकते आणि भांडवली बाजारात पैसा गुंतवण्याच्या मार्गांचे शिक्षण घेऊ शकते. आपण व्यवसायाच्या मुलभूत तत्त्वांपासून ते ट्रेडिंगच्या व्यूहरचनांपर्यंत बाजाराची कार्यपद्धती येथे पूर्णपणे शिकू शकतो. या काही साध्या पायऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही व्हेरी स्मार्ट' गुंतवणूकदार होऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.