Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलचे नवे मालक ठरले; 'या' कंपनीने जिंकला लिलाव

अनिल अंबानींची कंपनी कोणाच्या हातात जाणार, हे स्पष्ट झाले आहे.
Anil Ambani
Anil Ambani sakal
Updated on

Reliance Capital Auction : मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या लिलावासाठी सर्वात मोठी बोली लावणाऱ्याचे नाव समोर आले आहे. रिलायन्स कॅपिटलच्या झालेल्या लिलावात टोरेंट समूहाने बुधवारी सर्वाधिक बोली लावली.

अहमदाबादस्थित टोरेंट समूहाने अनिल अंबानी यांनी स्थापन केलेली नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) ताब्यात घेण्यासाठी 8,640 कोटी रुपयांची बोली लावली आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

टोरेंट ग्रुपने रिलायन्स कॅपिटल खरेदी करण्यासाठी ही ऑफर दिली आहे. हिंदुजा ग्रुपने ही कंपनी विकत घेण्यासाठी लिलावात भाग घेतला आणि 8150 कोटी रुपयांची ऑफर दिली, परंतु टोरेंट ग्रुपने सर्वात जास्त बोली लावल्यामुळे हिंदुजा ग्रुप ही कंपनी विकत घेऊ शकणार नाहीत.

हिंदुजा समूहाने दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च बोली लावली होती. कॉस्मिया पिरामल ग्रुप आधीच बोली प्रक्रियेतून बाहेर पडला. कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) ने लिलावासाठी 6,500 कोटी रुपयांची कमी किंमत मर्यादा निश्चित केली होती.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या आदेशानुसार, कर्जदारांना 31 जानेवारी 2023 पर्यंत रिलायन्स कॅपिटलची रिझोल्यूशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

हा लिलाव जिंकल्याने टोरेंट ग्रुपला आर्थिक सेवा क्षेत्रात चांगला फायदा होईल कारण या माध्यमातून टोरेंट ग्रुपला रिलायन्स जनरल इन्शुरन्समध्ये 100 टक्के हिस्सा मिळेल, तर टोरेंटला रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्समध्ये इतर मालमत्तांसह 51 टक्के हिस्सा मिळेल.

Anil Ambani
Cryptocurrency : RBI गव्हर्नर यांचे मोठे विधान; क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक संकट...

21,000 कोटी रुपयांच्या टोरेंट समूहाचे मालक 56 वर्षीय समीर मेहता आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने अनेक धोरणात्मक पुढाकार घेतला आहे आणि नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे.

उदाहरणार्थ, टॉरेंट समूहाने वीज आणि गॅस वितरण क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. टोरेंट फार्मास्युटिकल्स, टोरेंट ग्रुपची प्रमुख कंपनी, ही भारतातील अग्रगण्य फार्मा कंपन्यांपैकी एक आहे. आता रिलायन्स कॅपिटलची खरेदी केल्यानंतर कंपनीने नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.