ओव्हरटाइमच्या नियमांत बदलाची शक्यता, पगारावर होणार परिणाम!

work
workEsakal
Updated on
Summary

केंद्र सरकारकडून कामगार संहितेचे नियम लागू केल्यास होणार बदल

लवकरच तुमच्या नोकरीसंबंधीत बरेच नियम बदलणार आहेत. मोदी सरकारने कामगार संहिताचे (Labour Code) नियम लागू केले तर आपल्या कामाच्या वेळेपासून ओव्हरटाईमपर्यंतचे नियमही बदलतील. नव्या ड्राफ्टनुसार कायद्यात जास्तीत जास्त कामाचे तास वाढवून 12 तास करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तुम्ही जर 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यान जास्तीचे काम केले तर त्याची मोजदाद 30 मिनिटांचा ओव्हरटाईम म्हणून करण्यात येईल. काय आहेत हे सगळे नियम, सविस्तर वाचा...(Arthvishwa Possibility of change in rules regarding overtime will affect the salary)

work
सप्टेंबरपर्यंत नवे निर्बंध कायम, 'या' जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा

ओव्हरटाइम बाबतीतला नियम बदलेल

सध्याच्या नियमानुसार 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेला ओव्हरटाईम मानले जात नाही. ड्राफ्टमधील नियमांमध्ये 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यान जास्तीचे काम केले तर त्याची मोजदाद आता 30 मिनिट ओव्हरटाईम अशी केली जावी अशी सूचना यात ड्राफ्टमध्ये आहे. नियमांनुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला सलग 5 तासापेक्षा जास्त वेळ काम करायला मनाई आहे. कर्मचाऱ्यांना दर पाच तासानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक देण्याच्या सूचनाही या ड्राफ्टमध्ये देण्यात आल्या आहेत.

पगार कमी होईल आणि पीएफ वाढेल

हो तुम्ही बरोबर वाचताय, पगार होईल कमी... लेबर कोड नियमांच्या नुसार, बेसिक पगार एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे. यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या पगाराचे स्ट्रक्चर बदलेल. बेसिक पगार वाढला तर पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटीमध्ये कपात केलेली रक्कम वाढेल. यामुळे हातात पगार कमी येईल. पण एक गोष्ट चांगली होईल ती म्हणजे तुमचापीएफ वाढू शकेल.

रिटायरमेंट नंतर मिळणारे पैसे वाढतील

ग्रॅच्युइटी आणि पीएफ योगदानाच्या वाढीमुळे, रिटायरमेंटनंतर मिळणारे पैसेही वाढतील. PF आणि ग्रॅच्युइटी वाढीमुळे कंपन्यांची किंमतीत वाढ होईल, कारण कंपनीला कर्मचाऱ्यांना पीएफमध्येही जास्त वाटा द्यावा लागेल. या गोष्टींचा कंपन्यांच्या बॅलेन्सवरही परिणाम होईल. म्हणूनच सध्या हे नियम पुढे ढकलण्यात आले आहेत. हे नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार होते, पण राज्य सरकारे आणि कंपन्यांची तयारी नसल्यामुळे हे नियम तूर्तास पुढे ढकलले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()