बहूप्रतिक्षेत असलेल्या एलआयसीच्या (LIC) आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागली एलआयसीचा आयपीओ ४ मे रोजी ओपन होणार असून ९ मे पर्यंत गुंतणूक करता येणार आहे. या आयपीओची किंमत 21,000 कोटी रुपये आहे तर भारतातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा IPO असल्याचे सांगितले जात आहे. (As LIC ipo is coming next month check how to apply)
या आयपीओसाठी अर्ज करताना गुंतवणूकदारांना ऑनलाइन बँकिंगद्वारे लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्यांना इन्वेस्टमेंट सेक्शन मध्ये जावे लागेल. त्यानंतर
गुंतवणूकदारांनी IPO/e-IPO पर्यायावर क्लिक करावे. यानंतर डिपॉजिटरी डिटेल्स आणि बँक खात्याचा डिटेल्स भराव्यात. त्यानंतर वेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.
वेरिफिकेशनची प्रक्रियेनंतर, Invest in IPO सेक्शन मध्ये जा. ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तो पब्लिक ऑफर निवडा. त्यानंतर गुंतवणूकदारांना शेयरची संख्या आणि बिड प्राइस निवडण्याची आवश्यकता असते.
गुंतवणूकदारांनी त्यांची बोली लावण्यापूर्वी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. शेअर्स खरेदी केल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्यांना शेअर्सचे अलॉट झाले की नाही हे तपासायला विसरू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.