Atal Pension Yojana: ‘या’ सरकारी योजनेतून मिळणार महिन्याला 5 हजार; वाचा कोणाला होणार फायदा?

अटल पेंशन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला निवृत्तीनंतरच्या खर्चाची चिंता करावी लागणार नाही.
Atal Pension Yojana
Atal Pension YojanaEsakal
Updated on

अटल पेंशन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला निवृत्तीनंतरच्या खर्चाची चिंता करावी लागणार नाही. म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कुणावरच अवलंबून रहावे लागणार नाही. या योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासुन ते 5000 रुपयांपर्यंत पेंशन मिळवू शकता. ही योजना तुमच्या म्हतारपणात तुमचा खूप मोठा सहारा होऊ शकते. तुम्ही दर महिण्यांला थोडी थोडी रक्कम एकत्र करून तुमचे म्हतारपण हे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. केंद्र सरकारची ही सोशल सिक्युरिटी स्कीम अटल पेन्शन योजना (APY) अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आहे. या योजनेत पैसे जमा केल्यावर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. 

ऑक्टोबर महिन्यात या योजनेत कोणता मोठा बदल झाला आहे?

1 ऑक्टोबर 2022 पासून इनकम टॅक्स भरत असलेल्या म्हणजेच टॅक्सपेअर्सना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे.

Atal Pension Yojana
Chickpeas Recipe: हिवाळा स्पेशल काळ्या चण्याची पौष्टिक उसळ कशी तयार करायची?

काय आहे अटक पेंशन योजना ?

स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाचं बँकेत सेव्हिंग अकाऊंट किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट असणं अनिवार्य आहे. या अटींची पूर्तता करणारी कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी बँकेच्या शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधू शकते. याची प्रक्रिया ऑनलाइन देखील करता येते. यासाठी व्यक्तीला PRAN कार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे, जे NPS अंतर्गत रजिस्ट्रेशन आहे आणि त्यासाठी APY नोंदणी फॉर्म भरावा लागेल.या योजनेअंतर्गत अकाऊंटमध्ये प्रत्येक महिन्याला, तिमाहित किंवा सहा महिन्यांमध्ये ठराविक रक्कम भरल्यानंतर रिटायरमेंटनंतर 1 हजार 5 हजार रुपयांपर्यंतचं पेन्शन मिळतं.

Atal Pension Yojana
Winter Health Tips: चहा शिवाय हे तीन पेय देऊ शकतात तुम्हाला सर्दी खोकलापासून मुक्ती

या योजनेत काही महत्त्वाचे मुद्दे

1) 18 ते 40 या वयोगटातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

2) या योजनेत तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये पेंशन हवी असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये या योजनेत गुंतवावे लागतील.

3) दर महिन्याला 4000 रुपये पेंशन हवी असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 168 रुपये या योजनेत गुंतवावे लागतील.

4) दर महिन्याला 3000 रुपये पेंशन हवी असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 126 रुपये या योजनेत गुंतवावे लागतील.

5) दर महिन्याला 2000 रुपये पेंशन हवी असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 84 रुपये या योजनेत गुंतवावे लागतील.

6) दर महिन्याला 1000 रुपये पेंशन हवी असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 42 रुपये या योजनेत गुंतवावे लागतील.

Atal Pension Yojana
Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

या योजनेचे काही खास वैशिष्ट्ये

1) केंद्र सरकारने मे 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली होती. यापूर्वी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अटल पेन्शन योजनेसारखी कोणतीही योजना नव्हती. 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक यामध्ये नोंदणी करू शकतो. 

2) टॅक्सवरही मिळते सुटया योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्सच्या कलम 80CCD अंतर्गत सूटही मिळणार आहे.

3) अटल पेन्शन योजनेत मृत्यूचा लाभ (मृत्यूनंतर मिळणारा लाभ) खातेदाराच्या दुसऱ्या जोडीदाराला उपलब्ध मिळतो. जर खातेदाराचा मृत्यू झाला तर पेन्शनचा लाभ आपोआपच इतर जोडीदाराला हस्तांतरित केला जातो. अटल पेन्शन योजना सुरू केल्यावर दुसरा जोडीदार डीफॉल्ट नॉमिनी म्हणून अधिकृत होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.