फिनटेक : बिग डेटा ॲनॅलिटिक्स

क्रेडिट कार्डांशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी किंवा ती झाल्यानंतर त्यातून शक्य तितक्या लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.
Data Analytics
Data AnalyticsSakal
Updated on

क्रेडिट कार्डांशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी किंवा ती झाल्यानंतर त्यातून शक्य तितक्या लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. यासाठी आता मानवी हस्तक्षेप करून गुन्हे होण्याआधीच ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणे खूप कठीण असते. मुळात क्रेडिट कार्डांची एकूण संख्या आणि त्यांच्याद्वारे होत असलेले व्यवहार हे इतकं प्रचंड आहेत, की अशा प्रत्येक व्यवहारावर नजर ठेवणे आणि त्यामध्ये एखादा गुन्हा तर होत नाही ना, याची काळजी घेणे हे माणसे नेमून करण्याचे काम अजिबातच नाही. म्हणूनच अशा कामांसाठी संगणकांचा वापर करावा लागतो. त्याला ‘बिग डेटा ॲनॅलिटिक्स’ असे म्हणतात. आता यात कोणत्या प्रकारचे गुन्हे घडू शकतात, याचा विचार केला तर सर्वांत मोठ्या प्रमाणावर घडणारा गुन्हा म्हणजे क्रेडिट कार्ड आणि त्या कार्डासाठीचा गुप्त पिन हे दोन्ही चोरीला जाणे. अशा वेळी हे कार्ड वापरून केल्या जाणाऱ्या खरेदीच्या प्रमाणात अगदी लगेचच मोठी वाढ झाल्याचे सर्वसामान्यपणे दिसून येते.

अशा प्रकारचा गुन्हा खरे म्हणजे सहजपणे थांबवता येतो. तो कसा?

सर्वसामान्यपणे क्रेडिट कार्डधारक कोणते व्यवहार करतो, याचा येथे विचार केला जातो. अशा व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर त्या कार्डधारकाच्या क्रेडिट कार्डावरून होत असलेल्या नव्या व्यवहारांची छाननी केली जाते. म्हणजेच नव्याने होत असलेल्या व्यवहारांमध्ये काही संशयास्पद किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे वाटते का, यावर लक्ष केंद्रित केले जाते. इतकेच नव्हे, तर या कार्डधारकाच्या सर्वसामान्य व्यवहारांप्रमाणेच इतर लोकांच्या तशाच प्रकारच्या व्यवहारांचाही यात विचार केला जातो.

पण हे कसे घडते? तर कोणतीही बॅंक तिच्या क्रेडिट कार्डधारकांच्या व्यवहारांविषयीचे खूप तपशील गोळा करीत राहते. यातून या बॅंकेकडे या कार्डधारकांचे निरनिराळ्या प्रकारचे गट तयार होतात. म्हणजेच सर्वसाधारणपणे कार्ड वापरून फक्त ऑनलाइन पुस्तके विकत घेणारे लोक, हॉटेलमध्ये ठरावीक रकमांची बिले भरणारे लोक, पेट्रोल भरणारे लोक, यामधील एकापेक्षा जास्त व्यवहार करणारे लोक, फक्त पुण्यात क्रेडिट कार्ड वापरणारे लोक, फक्त मुंबईत क्रेडिट कार्ड वापरणारे लोक, पुण्यात आणि मुंबईत क्रेडिट कार्ड वापरणारे; पण फक्त दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठीचे लोक, अशा असंख्य प्रकारचे गट म्हणजेच ‘क्लस्टर्स’ बॅंकेकडे तयार होतात.

समजा, ७० वर्षे वयाच्या सदाशिव पेठेमध्ये राहणाऱ्या आजोबांनी अचानकपणे एक स्पोर्ट्स कार खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले. सर्वसाधारणपणे हे आजोबा आपले क्रेडिट कार्ड फक्त हॉटेल, पेट्रोल पंप, दुकान अशा ठिकाणीच वापरतात. लगेचच संबंधित बॅंकेचे सॉफ्टवेअर क्रेडिट कार्डाचा हा व्यवहार नेहमीपेक्षा खूप भिन्न असल्यामुळे त्यात काहीतरी काळंबेरं असल्याचे सूचित करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.