अमेरिकेतील प्रख्यात ‘टाईम’ मासिकाने ‘अमेरिकेचे नंबर वन मनी मॅनेजर’ या बिरुदाने गौरविलेल्या पीटर लिंच यांचे हे पुस्तक सर्वसामान्यांना, स्वतःचे शेअर स्वतः निवडण्यासाठी प्रोत्साहित करते. पीटर लिंच यांनी १९७७ ते १९९० या १३ वर्षांच्या काळात फिडेलिटी म्युच्युअल फंडाची ‘मॅगेलन’ ही योजना नावारूपाला आणली. ज्या गुंतवणूकदारांनी १९७७ मध्ये या योजनेत १००० डॉलरची गुंतवणूक केली होती, त्या गुंतवणुकीचे मूल्य १९९० मध्ये २८००० डॉलर झाले! या काळात त्यांनी १५,००० कंपन्यांचे शेअर खरेदी केले. अशा उत्कृष्ट फंड मॅनेजरने ‘वन-अप ऑन वॉल स्ट्रीट’ या ‘बेस्ट सेलर’मध्ये, सर्वसामान्य गुंतवणूकदार करीत असलेल्या १२ ठळक चुका उदाहरणांसह सविस्तर वर्णन केल्या आहेत. त्यापैकी काही ठळक चुका पुढीलप्रमाणे...
एखाद्या शेअरचा भाव खूप पडला असताना, तो अजून खाली जाणार नाही, असे मानणे.
‘बॉटम फिशिंग’ करणे किंवा पडती सुरी पकडण्याचा प्रयत्न करणे.
एखाद्या शेअरचा भाव खूप वाढला असताना, तो अजून वाढणे शक्य नाही, असे मानणे.
‘पेनी स्टॉक’ मोठ्या संख्येने खरेदी करणे.
विक्रीसाठी ‘राउंड फिगर’ होण्याची किंवा
आपल्या मनातील ‘टार्गेट’ पूर्ण होण्याची वाट पाहणे.
एखाद्या शेअरबद्दलचा ‘पेशन्स’ संपून तो विकणे (त्यानंतरच त्याचा भाव वाढू लागतो.)
एखाद्या शेअरमध्ये अनेकांचे झालेले नुकसान बघून तो शेअर न खरेदी केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटणे.
एखाद्या शेअरचा भाव वाढला तर आपले ‘जजमेंट’ बरोबर आहे व पडला तर ते चुकले असे मानणे.
या पुस्तकात दिलेली सर्व उदाहरणे अमेरिकी कंपन्यांची असली तरी यात सांगितलेली प्रत्यक्ष शेअर खरेदी-विक्रीची मार्गदर्शक तत्त्वे सर्वांनाच उपयोगी पडतील अशी आहेत, यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.