येत्या ९ महिन्यात ८० टक्क्यांनी वाढू शकतो 'हा' शेअर

Share Market
Share Market
Updated on

अमारा राजा बॅटरीज या कंपनीने गेल्या एका वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. मात्र गेल्या वर्षात या कंपनीच्या समभागात केवळ ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर त्याच काळात निफ्टीमध्ये मात्र ५० टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. यंदाच्या वर्षातील आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास यंदा Amara Raja या कंपनीने निफ्टीच्या तुलनेत कमी प्रमाणात वाढ दाखवली आहे. यंदा या कंपनीच्या शेअरमध्ये १९ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळतेय. तुलनेत निफ्टीमध्ये मात्र १२ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळते आहे तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा BSE 200 index देखील १५ टक्के वधारला आहे.

Share Market
Gold Prices: सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले; जाणून घ्या आजच्या किंमती

आता पुढे गुंतवणुकीबाबत काय असावी रणनीती?

अमारा राजा बॅटरीज या कंपनीचं भांडवल तब्बल १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचं आहे. त्यामुळे येत्या काळात या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी रॅली पाहायला मिळू शकते असं शेअर बाजारातील जाणकार म्हणतायत. पुढील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत मागील ५२ आठवड्यातील उच्चांकी किमतीच्या वर म्हणजेच १ हजार २५ रुपयांच्या वर जाऊ शकते, असंही तज्ज्ञाना वाटतं आहे.

Share Market
Airtel-TCS स्ट्रॅटेजिक पार्टनर, 5G सर्विसच्या दृष्टीने मोठी पावलं...

जाणून घ्या टार्गेट्स

रिलायसन्स सेक्युरिटीजच्या जतीन गोहिल यांच्या मते जास्त अवधीसाठी विचार केल्यास मूव्हिंग ऍव्हरेज इंडिकेटर तेजी दर्शविते आहे. त्यामुळे जतीन गोहिल यांनी या कंपनीच्या शेअर्ससाठी १ हजार ११५ ते १ हजार ३५० रुपयांचं टार्गेट दिलेलं आहे. हे टार्गेट २२ जूनच्या क्लोजिंग किमतीपेक्षा तब्बल ५० ते ८० टक्के अधिक आहे. या खरेदीसाठी जतीन यांनी ६३० रुपयांचा स्टॉपलॉस सुचवला आहे.

Share Market
'हे' हेवीवेट शेअर्स पुढेही देणार तगडा परतावा, ब्रोकर हाऊसेसने सुचवलेले शेअर्स

इलेक्ट्रिक गाड्यांच्या थीम मुळे कंपनीचा फायदा

अमारा राजा बॅटरीज ही अमारा राजा समूहाची प्रमुख कंपनी आहे. ऑटो सेक्टरमध्ये गरजेच्या असणाऱ्या बॅटरीच्या तंत्रज्ञानावर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. भारतात या कंपनीचा चांगला बोलबाला आहे, सोबतच ३२ विविध देशांमध्ये देखील कंपनी आपल्या बॅटरीज निर्यात करते. अनलॉक झाल्यानंतर, सोबतच इलेक्ट्रिक गाड्यांच्या थीम मुळे या कंपनीचा तगडा फायदा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.