Bajaj Electric Chetak Delivery: बजाज ऑटो (Bajaj Auto) इलेक्ट्रिक स्कूटर चेतक (Electric Chetak) ची डिलिव्हरी सप्टेंबर तिमाहीपासून सुरू होऊ शकते. कस्टमर्सच्या जबरदस्त रिस्पॉन्समुळे कंपनीने यावर्षी एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक चेतकची (Electric Chetak) बुकिंग बंद केली होती.बजाजच्या 2020-21मधील वार्षिक रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. बजाजने मोठ्या काळानंतर त्यांचा लोकप्रिय स्कूटर ब्रँड चेतकला इलेक्ट्रिक (Electric Chetak) अंदाजात समोर आणले आहे. यात दोन व्हेरियंट्स चेतक प्रीमियम (Chetak Premium) आणि चेतक अर्बन (Chetak Urbane) मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होतील. (Bajaj Chetak electric scooter deliveries to begin in September)
सप्लाय चेनमध्ये अडचणी
2020 च्या सुरुवातीला जेव्हा चेतकची बुकिंग सुरू झाली होती, तेव्हा कोविड 19 मुळे सप्लाय चेनमध्ये अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे बुकिंग थांबवावी लागल्याचे बजाज ऑटोचे माजी चेअरमन राहुल बजाज यांनी म्हटले. पण लवकरच बुकिंग पुन्हा सुरू होईल आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होतील असेही राहुल बजाज यांनी म्हटले.
पुन्हा ऑनलाइन बुकिंग सुरू
13 एप्रिल 2021 ला पुन्हा ऑनलाइन बुकिंग सुरू झाली, आणि जबरदस्त रिस्पॉन्सनंतर केवळ 48 तासांत बुकींग थांबवावी लागली. रिस्पॉन्स जास्त असल्याने ही बुकिंग थांबवण्यात आली, पण लवकरच पुन्हा एकदा बुकिंग सुरू होईल आणि आयकॉनिक मॉडल इलेक्ट्रिक चेतकची डिलिव्हरी फायनांशिअल इयर 2022 च्या दूसऱ्या तिमाहीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
सिंगल चार्जमध्ये चालते 95 KM
बजाज ऑटोमध्ये 'IP67' रेटेड हायटेक लिथियम ऑयन बॅटरी लावण्यात आली आहे. याला स्टँडर्ड 5 एम्पीयरच्या इलेक्ट्रिक आउटलेटवर चार्ज करता येते. इको मोडवर ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 95 किमी आरामात पार करते. यात ऑनबोर्ड इंटेलिजंस बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आहे, जे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग कंट्रोल करते.
पुण्याजवळच्या चाकण प्लांटमध्ये प्रोडक्शन
शिवाय इलेक्ट्रिक चेतकमध्ये फुल्ली कनेक्टेडर रायडिंगचा अनुभव मिळेल. यात डेटा कम्युनिकेशन, सिक्युरिटी आणि यूजर ऑथेंटीकेशन सारखे मोबिलिटी सॉल्यूशन दिलेत. इलेक्ट्रिक स्कूटर असल्यामुळे प्रदूषण कमी व्हायला नक्की मदत होईल. चेतकचे प्रोडक्शन बजाजच्या पुण्याजवळच्या चाकण प्लांटमध्ये सुरू आहे. तुमची लाडकी इलेक्ट्रिक चेतक (Electric Chetak) लवकरच तुमच्या सेवेत दाखल होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.