बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट व्याज दरात वाढ; वाचा सुधारित व्याजदर

Bajaj finance FD Rate
Bajaj finance FD RateSakal Digital
Updated on

बजाज फायनान्सच्या सर्व गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे; 10 bps सह दरातील वाढीसह, त्याने किमान FD ठेव रक्कम देखील कमी केली आहे. 15,000 पासून रु. 25,000. बजाज फायनान्स FD वर रु. पर्यंतचे सुधारित दर. 5 कोटी रुपये 10 मे 2022 पासून प्रभावी आहेत आणि ते ताज्या ठेवी आणि परिपक्वता ठेवींच्या नूतनीकरणासाठी लागू होतील. पुनरावृत्तीनंतर, 36 महिने ते 60 महिन्यांदरम्यानच्या ठेवी 7% p.a इतका एकत्रित परतावा देईल. ज्येष्ठ नागरिक 0.25% पर्यंत उच्च एफडी दरांचा लाभ घेऊ शकतात, जे 7.45% प्रति वर्षाचे खात्रीशीर परतावा देऊ शकतात. 44 महिन्यांसाठी.

इतर गुंतवणुकदारांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.25% व्याज दराचा लाभ मिळणार आहे. 10 मई 2022 नंतर करण्यात आलेल्या सर्व एफडी गुंतवणुकींसाठी मुदत ठेवींचे नवीन दर लागू होणार आहेत.

सर्व वर्गवारीतील गुंतवणूकदार आणि कालावधीसाठी एफडी व्याज दर वाढविण्यात आले आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या गुंतवणुकीत झटपट वाढ होणार आहे. 10 मई 2022 नंतर करण्यात आलेल्या सर्व ठेवींवरील व्याज दरात वाढ झालेली आहे. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट गुंतवणूक पर्यायांच्या सर्व वैशिष्ट्यांचा झटपट वेध घेऊ.

1. वाढीव एफडी दर: अलीकडच्या काही वर्षांत फिक्स्ड डिपॉझीट हे तुलनेने अल्प परतावा देणारे गुंतवणूक साधन ठरले. मात्र बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटची गोष्टच न्यारी! कोणतीही बँक देणार नाही, इतका 7.45% एफडी दराने गुंतवणुकीच्या परताव्याचे वचन बजाज फायनान्स देते. 60 वर्षाखालील ग्राहकांना 24-35 महिन्यांसाठी 6.40% ने कमाई करणे शक्य आहे. तसेच 36-60 महिन्यांची निवड केल्यास 7.00% ची निवड ते करू शकतात. ज्येष्ठ नागरीकांसाठी व्याज दर तक्ता खालीलप्रमाणे:

Table
Tablesakal

बदललेल्या दरांचा परिणाम ज्येष्ठ नागरीक senior citizens, गुंतवणुकदारांना झालेला असून आता त्यांना 36-60 महिन्यांकरिता 7.25%वार्षिक दराने कमाई करता येणार आहे. तसेच 24-35 महिन्यांसाठी हा दर वर्षाला 6.65% याप्रमाणे राहील. ज्येष्ठ नागरिकांकरिता व्याज दर तक्ता खाली नमूद केल्याप्रमाणे राहील:

Table 2
Table 2sakal

2. विशेष एफडी व्याज दर: सर्व ग्राहकांसाठी बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटने खास व्याज दराचा समावेश केला आहे. विशेष व्याज दरासह एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीची निवड करून प्रती वर्ष 7.45% व्याज दराची मजा घेऊ शकते.

44 महिन्यांच्या कालावधीसाठी, 60 वर्षाखालील ग्राहक वर्षाला 7.20% व्याज दराची मजा घेऊ शकतात तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर प्रती वर्ष 7.45% याप्रमाणे राहील.

60 वर्षांखालील ग्राहकांकरिता विशेष व्याज दर तक्ता खालीलप्रमाणे:

Table 3
Table 3sakal

ज्येष्ठ नागरिकांसाठी, लागू विशेष व्याज दर:

sakal

3. सुरक्षित गुंतवणूक करा: काही निराळ्या प्रकारच्या गुंतवणुका चांगल्या परताव्याचे वचन देत असतील, तरीही त्यात गंभीर स्वरूपाचे बाजारातील चढ-उतार समाविष्ट असतात. फिक्स्ड डिपॉझीट हा त्यामानाने सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरतो. त्याशिवाय, बजाज फायनान्सला अनुक्रमे क्रिसील आणि आयसीआरएकडून सर्वोच्च सुरक्षेचे एफएएए आणि एमएएए प्रमाणपत्र लाभलेले आहे.

4. 100% ऑनलाईन प्रक्रिया: Bajaj Finance online FD सर्वसमावेशक ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देते. ही 5 टप्प्यांवर आधारीत प्रक्रिया 10 मिनिटांहून कमी वेळ घेते. लॅपटॉप, मोबाईल फोन किंवा टॅबलेटवर ती पूर्ण होऊ शकते. सध्या या सेवेचे ग्राहक असलेल्यांनी त्यांची माहिती पडताळून पाहावी, नवीन ग्राहक ऑनलाईन केव्हायसी प्रक्रियेमुळे वेळेची लक्षणीय बचत करू शकतात. तसेच नेट बँकिंग किंवा युपीआय वापरून पेमेंट/भरणा करता येतो.

5. ठरावीक कालावधी अनुरूप पेआऊट: बजाज फायनान्सद्वारे एखाद्या व्यक्तिला जमा व्याजाचे नियमित पेआऊट मिळू शकतील. गुंतवणुकदारांना मासिक, तिमाही, सहमाही किंवा वार्षिक असे चार पेआऊट पर्याय उपलब्ध होऊ शकतील. ज्येष्ठ नागरिकांना ठरावीक कालावधीने निधीची आवश्यकता असते. त्यांना या वैशिष्ट्याचा भरपूर लाभ मिळणार आहे.

6. ठरावीक कालावधीची बचत: बजाज फायनान्सतर्फे सिस्टमॅटीक डिपॉझीट प्लान (एसडीपी) उपलब्ध करून देण्यात येतो. ज्यांना मोठ्या वित्तीय उद्दिष्टांकरिता लहान आणि ठरावीक कालावधीने रकमेची गरज असते, त्यांच्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो. बजाज फायनान्स देखील सिस्टमॅटीक डिपॉझीट प्लान (एसडीपी) उपलब्ध करून देते. नियमित मुदत ठेवींप्रमाणे, एखादी व्यक्ती एकरकमी गुंतवणूकही करू शकते, एसडीपी तुम्हाला स्थिर मासिक बचतीचे स्वातंत्र्य देते. 6 ते 48 महिन्यांसाठी दर महिन्याला ग्राहक किमान रू. 5,000 गुंतवू शकतील.

बजाज फायनान्स लिमिटेडविषयी:

बजाज फायनान्स लिमिटेड ही बजाज फिनसर्व समुहाची कर्ज आणि गुंतवणुकविषयक शाखा आहे. भारतीय बाजारातील ही एक अतिशय विविधांगी एनबीएफसी असून देशातील 44 दशलक्ष ग्राहकांना सेवा पुरविते. कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. कंपनीच्या उत्पादन सेवांमध्ये कन्झुमर ड्यूरेबल लोन, लाइफस्टाइल फायनान्स, डिजिटल प्रोडक्ट फायनान्स, पर्सनल लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, स्मॉल बिझनेस लोन, होम लोन, क्रेडीट कार्ड्स, टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर लोन, कमर्शियल लेंडिंग/एसएमई लोन, लोन अगेन्स्ट सिक्युरिटी व रुरल फायनान्स ज्यामध्ये गोल्ड लोन आणि वेहिकल रिफायनान्सिंग लोनचा समावेश आहे. आज देशातील एनबीएफसीपैकी केवळ बजाज फायनान्स लिमिटेडला सर्वोच्च FAAA/ स्टेबलचे सर्वोच्च क्रेडीट रेटींग लाभले आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.bajajfinserv.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.