Bank Holiday in January 2023 : नवीन वर्ष सुरू झाले आहे. तुमचाही या महिन्यात बँकेत जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी 2023 मध्ये बँकांना दीर्घ सुट्टी असणार आहे. या महिन्यात 4 किंवा 5 नाही तर तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुमचा बँकेत जाण्याचा विचार असेल तर तुम्ही सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा.
आरबीआयने यादी केली जाहीर :
रिझव्र्ह बँकेच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांमध्ये शनिवार, रविवार व्यतिरिक्त राज्याच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीलाच बँकांच्या सुट्ट्यांची यादी आरबीआयकडून जारी केली जाते.
हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
जानेवारीतील बँकांच्या सुट्ट्यांची यादी :
26 जानेवारी - रविवारमुळे देशभरातील बँका बंद.
2 जानेवारी - मिझोरममध्ये बँका बंद राहतील
8 जानेवारी - रविवारमुळे बँका बंद राहतील
11 जानेवारी - मिशनरी डेनिमित्त मिझोराम बँका बंद
12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँक बंद
14 जानेवारी - मकर संक्रांतीनिमित्त देशभरातील बँका बंद.
15 जानेवारी - रविवारमुळे बँक बंद
22 जानेवारी - रविवारमुळे बँक बंद
23 जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आसामच्या बँका बंद.
25 जानेवारी - हिमाचल प्रदेश बँक बंद
26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनानिमित्त बँक बंद
28 जानेवारी - चौथ्या शनिवारमुळे बँक बंद
29 जानेवारी - रविवारमुळे बँक बंद
31 जानेवारी - आसाममध्ये बँकांना सुट्टी असेल.
ऑनलाइन सुविधांचा घेता येईल लाभ :
माहिती देताना बँकेने सांगितले आहे की, शाखा बंद असताना ग्राहक ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता. ग्राहकांना कोणतेही महत्त्वाचे काम किंवा व्यवहार करायचे असल्यास ते नेटबँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.