Bank Fraud : जगातील सगळ्यात मोठ्या बँकेला घातला कोट्यावधींचा गंडा, 40 लाख बनावट खाती बनवली अन्...

जगातील सर्वात मोठ्या बँकेच्या फसवणूकीचे प्रकरण उघडकीस आले आहे
Bank Fruad
Bank FruadSakal
Updated on

Bank Fruad : तुम्ही क्षुल्लक फसवणुकीबद्दल ऐकले असेलच. पण बँकेची फसवणूक झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? हे खरं आहे. खरं तर, अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या JPMorgan सोबतची एक मोठी फसवणूक उघडकीस आली आहे.

2021 मध्ये, अमेरिकेतील सर्वात मोठी बँक जेपी मॉर्गनने 1423 कोटी रुपयांना वित्तीय नियोजन वेबसाइट फ्रँक विकत घेतली. आता असे समोर आले आहे की, फ्रँकची सुमारे 40 लाख ग्राहक खाती बनावट आहेत.

अमेरिकन बँक जेपी मॉर्गनने सध्या फ्रँक वेबसाइट बंद केली आहे. याशिवाय कंपनीचे संस्थापक चार्ली जेव्हिस यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रँक वेबसाइट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळविण्यात मदत करते.

चार्ली जॅव्हिस आणि कंपनीचे चीफ ग्रोथ ऑफिसर ऑलिव्हियर आमेर यांनी डील दरम्यान सांगितले की, 4 दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेबसाइटवर खाती तयार केली आहेत.

जेपी मॉर्गनने आरोप केला की, प्रत्यक्षात केवळ 3 लाख वापरकर्ते होते. उर्वरित वापरकर्ते स्टार्टअप विकण्यासाठी तयार केले गेले.

हेही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जेपी मॉर्गनने आरोप केला आहे की, जाव्हिसने वेबसाइटबद्दल खोटी माहिती दिली. कंपनीच्या संस्थापकाने वापरकर्त्याचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहितीचा बनावट डेटाही दिला.

जाव्हिसने सुरुवातीला गोपनीयतेचा हवाला देत ग्राहकांची माहिती शेअर करण्यास नकार दिला होता. बँकेच्या म्हणण्यानुसार, बनावट खाते तयार करण्यासाठी डेटा सायन्सच्या प्राध्यापकाची मदत घेण्यात आली होती.

Bank Fruad
Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बंदीवर RBI गव्हर्नर यांचे सूचक विधान; म्हणाले, क्रिप्टोकरन्सी हा फक्त...

चार्ली जेव्हिसच्या वकिलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जेपी मॉर्गनने नोव्हेंबर 2022 मध्ये त्याला चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकले होते, जेणेकरून त्याला 228 कोटी रुपये भरपाई म्हणून द्यावे लागणार नाहीत. असा आरोप करून जाव्हिसने काही दिवसांपूर्वी बँकेविरुद्ध खटलाही दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.