Bank Holidays November 2022 : नोव्हेंबरमध्ये बँकेची काम प्लॅन करताना आधी 'हे' वाचा

जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा.
Bank Holidays November 2022
Bank Holidays November 2022 esakal
Updated on

Bank Holidays November 2022 : नोव्हेंबर महिना सुरू होण्यासाठी थोडेच दिवस उरले आहेत. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत.आरबीआयने सुट्ट्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे.

Bank Holidays November 2022
Bank job : एसबीआयमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; दीड हजार जागांवर भरती

यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या आहेत, ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत.

Bank Holidays November 2022
Bank Holiday During Diwali : सणासुदीच्या धामधुमीत बँकांना टाळे!

नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत

  • १ नोव्हेंबर २०२२ – कन्नड राज्योत्सव/कुट – बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद

  • ६ नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • ८ नोव्हेंबर २०२२ – गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगाळा उत्सव – आगरतळा, बंगलोर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम वगळता बँका बंद

  • ११ नोव्हेंबर २०२२ – कनकदास जयंती / वांगला उत्सव – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद

  • १२ नोव्हेंबर २०२२ – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

Bank Holidays November 2022
Banking : सरकारी बँकांसाठी आता एकच हेल्पलाइन; ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण
  • १३ नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • २० नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • २३ नोव्हेंबर २०२२ – सेंग कुत्सानेम- शिलॉन्ग येथे बँक बंद

  • २६ नोव्हेंबर २०२२ – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

  • २७ नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.