Bank Holidays in June 2022
Bank Holidays in June 2022esakal

Bank Holiday : जून महिन्यात 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद

Published on
Summary

तीन दिवसांनंतर म्हणजेच, बुधवारपासून जून महिना सुरू होत आहे.

Bank Holidays in June 2022 : तीन दिवसांनंतर म्हणजेच, बुधवारपासून जून महिना सुरू होत आहे. या वर्षी जूनमध्ये देशातील सर्व सरकारी (Government Bank) आणि खासगी बँका 8 दिवस बंद राहणार आहेत. या बँक सुट्ट्यांमध्ये 6 साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे, तर प्रादेशिक सणांच्या निमित्तानं दोन दिवस बॅंका बंद राहतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, जून सुरू होताच बँका 2 तारखेला बंद राहतील. त्यामुळं बँकेत तुमचं काही महत्त्वाचं काम असल्यास ते बुधवारपर्यंत निकाली काढा. देशातील सर्व बँकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॉलिसी आणि सुट्टी दोन्ही ठरवत असते.

Bank Holidays in June 2022
छत्रपती संभाजीराजेंचा 'यांनी' ठरवून गेम केला; भाजप आमदाराचा नेमका निशाणा कोणावर?

कोणत्या दिवशी बंद राहणार बँका

जून 2022 मध्ये देशातील सर्व बँका 5, 12, 19 आणि 26 जून रोजी रविवार असल्यामुळं बंद राहतील. तर, 11 आणि 25 जून रोजी महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार असल्यानं देशातील सर्व बँका बंद राहतील. याशिवाय 2 जून रोजी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शिमल्यात बँका बंद राहणार आहेत. तसेच मिझोराम, भुवनेश्वर, जम्मू आणि काश्मीरमधील बँका 15 जून रोजी YMA दिन, गुरु हरगोविंद जयंती आणि राजा संक्रांतीच्या निमित्तानं बंद राहतील. मात्र, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, पाटणा, रांची, चंदिगड, जयपूर, रायपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा या भागातील बँका फक्त 6 दिवस बंद राहणार आहेत.

Bank Holidays in June 2022
भाजप बहुमताच्या एकदम जवळ; कर्नाटक विधान परिषदेवर 7 उमेदवारांची बिनविरोध निवड

June 2022 : बँक सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत

  • 2 जून, महाराणा प्रताप जयंती (शिमला)

  • 5 जून, रविवार

  • 11 जून, दुसरा शनिवार

  • 12 जून, रविवार

  • 15 जून, YMA दिवस, गुरु हरगोविंद जयंती, राजा संक्रांती (मिझोरम, भुवनेश्वर, जम्मू आणि काश्मीर)

  • 19 जून, रविवार

  • 25 जून, चौथा शनिवार

  • 26 जून, रविवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()