Baroda Tiranga Deposits : 'बँक ऑफ बडोदा'ची नवी योजना; FDवर जबरदस्त परतावा

ही एक विशेष देशांतर्गत रिटेल मुदत ठेव योजना आहे. ही योजना ग्राहकांना मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देते.
Baroda Tiranga Deposits
Baroda Tiranga Depositsgoogle
Updated on

मुंबई : अनेक हप्त्यांमध्ये आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने एफडी गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. मुदत ठेवी किंवा एफडीवरील व्याजदर गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत. लोकांना त्यांच्या ठेवींवर चांगला परतावा मिळत आहे.

सरकारी बँक ऑफ बडोदाने एक विशेष योजना सुरू केली आहे. त्याचे नाव Baroda Tiranga Deposits आहे. ही एक विशेष देशांतर्गत रिटेल मुदत ठेव योजना आहे. ही योजना ग्राहकांना मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देते. बडोदा तिरंगा ठेवी दोन मुदतीत उपलब्ध आहेत.

Baroda Tiranga Deposits
SBI, HDFC बँकेच्या FD व्याजदरात वाढ; जाणून घ्या कारण!

बडोदा तिरंगा ठेव योजनेत, ४४४ दिवसांच्या मुदत ठेवींवर ५.७५ टक्के व्याजदर दिला जात आहे. त्याच वेळी, ५५५ दिवसांच्या मुदत ठेवीचा व्याज दर ६ टक्के ठेवण्यात आला आहे.

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळणार आहे. अशाप्रकारे, ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवसांच्या मुदत ठेवीवर ६.२५ टक्के आणि ५५५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ६.५० टक्के परतावा मिळेल. त्याच वेळी, नॉन-कॉलेबल ठेवींवर ०.१५ टक्के अधिक परतावा मिळेल.

Baroda Tiranga Deposits
Post Office ची 'ही' स्कीम बँकेपेक्षाही देते जास्त रिटर्न

बडोदा तिरंगा ठेव योजना १६ ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे. ही योजना डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बॉब वर्ल्ड अॅप वापरून ऑनलाइन एफडी उघडू शकतात.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली

अजय के खुराना, कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा म्हणाले, “भारताला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, आम्ही ग्राहकांना आनंद साजरा करण्याचे आणखी एक कारण देत आहोत. बडोदा तिरंगा ठेव योजना उच्च व्याज दर देते. तसेच, गुंतवणूकदारांना दोन कार्यकाळांमधून निवड करण्याची संधी मिळते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.