Credit Card : सध्याच्या घडीला क्रेडिट कार्ड नसणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. क्रेडिट कार्डचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. तुमच्याकडे भलेही पैसे नसतील तरीही तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू पटकन खरेदी करु शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. म्हणजेच तुमचा शौक पुर्ण करण्यासाठी पैशांची अडचण येत नाही. दुसरीकडे जर काही एमर्जंसी आली, आणि तुमच्याकडे पैसे नाहीत, तेव्हाही क्रेडीट कार्ड तुमच्यासाठी धावून येतं. पण अनेकदा असं होतं लोकं क्रेडीट कार्डचा वापर विना प्लानिंग करतात आणि इन्कमपेक्षा जास्त खर्च करुन बसतात. जेव्हा रिपेमेंटची वेळ येते तेव्हा अडचणीत सापडतात. क्रेडिट कार्डवर 30%पेक्षाही जास्त व्याज द्यायला लागतं. चला जाणून घेऊयात क्रेडिट कार्डचे 5 साइड इफेक्ट..(Be very careful with your credit card spending)
नाही तर द्यावे लागेल जास्त व्याज
क्रेडिट कार्ड वर जास्त इंटेरेस्ट द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही वेळेत बिल भरत नाही तेव्हा, व्याज कॅरी फॉरवर्ड होतं, आणि त्यावर पुन्हा व्याज लागते. हे व्याज महिना 3 टक्के पासून वार्षिक 30 ते 36 टक्के पर्यंत जाऊ शकते.
गरजेपेक्षा जास्त खर्च
क्रेडिट कार्ड एका प्रकारे उसनवार म्हणजेच कर्ज घ्यायला भाग पाडते. क्रेडिट कार्डमुळे गरज नसताना आणि अवास्तव खर्च केला जातो, ज्यामुळे बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागतो.
कर्जाचा विळखा
क्रेडिट कार्डचा विचारपूर्वक वापर केला नाही तर मोठं नुकसान होऊ शकते. क्रेडिट कार्डमध्ये असेच बरेचसे चार्जेस आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसते, क्रेडिट कार्डवरून खरेदी केली की मग चार्जेस बद्दल समजतं, आणि मग तुम्ही कपाळावर हात मारून घेता.
टर्म अँड कंडीशनवर असुदे लक्ष
क्रेडिट कार्ड घेत असताना कोणीही टर्म अँड कंडीशन बघत नाही. या कंडीशन नीट वाचल्या तर लक्षात येईल की बँक कधीही व्याजदर वाढवू शकते. ही झाली एक गोष्ट अशा बऱ्याच गोष्टी या टर्म अँड कंडीशन मध्ये समाविष्ट आहेत.
सीबिल स्कोअर होईल खराब
क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर जर रीपेमेंट करणं अशक्य झालं तर तगड्या व्याज दराला सामोरे जावे लागेल, यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो, याचा थेट परिणाम दूसरे लोन घेताना होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.