म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जेव्हाही गुंतवणूक कराल तेव्हा नक्कीच लक्षात ठेवा, की ही रिस्क फ्री गुंतवणूक नाही.
म्युच्युअल फंड (Mutual funds) ही बाजाराशी (Market) जोडलेली गुंतवणूक (Investment) आहे. यामुळे तुम्ही जेव्हाही येथे गुंतवणूक कराल तेव्हा नक्कीच लक्षात ठेवा, की ही रिस्क फ्री गुंतवणूक नाही. तज्ज्ञांच्या मते, जर गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक केली तर एकीकडे जोखीम घटक कमी होतात, तर दुसरीकडे उच्च परतावा मिळण्याची शक्यता वाढते. मात्र यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan) म्हणजेच SIP ही पद्धत सर्वोत्तम आहे. फक्त 1000 रुपये गुंतवून तुम्ही म्युच्युअल फंडाद्वारे 1 कोटी रुपयांचा निधी कसा मिळवू शकता, हे जाणून घ्या. (Become a millionaire by investing rupees one thousand in SIP scheme)
सेबीचे (SEBI) नोंदणीकृत तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी (Jitendra Solanki) म्हणतात, दीर्घकाळात म्युच्युअल फंड 12 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. परंतु, जर तुम्ही ते जास्त काळ ठेवले तर तुम्हाला 15 ते 16 टक्के परतावा मिळू शकतो. मात्र यासाठी एसआयपी निवडण्यासोबतच चांगली तयारीही करावी लागेल. जितेंद्र सोलंकी म्हणतात, की जर कोणी 34 वर्षांसाठी 1000 रुपये गुंतवले तर फंड 1 कोटी रुपयांपर्यंत बनवू शकतो.
ट्रान्ससेंड कॅपिटलचे (Transcend Capital) गुंतवणूक संचालक कार्तिक जव्हेरी (Karthik Jawaheri) सांगतात की, जसजसे उत्पन्न वाढेल, तसतशी गुंतवणुकीची टक्केवारी वाढवणे योग्य ठरेल. कार्तिक जव्हेरी म्हणतात, की मासिक गुंतवणूक 1000 रुपयांपर्यंत असल्यास दरवर्षी गुंतवणूक 15 टक्क्यांनी वाढवली पाहिजे. त्यामुळे 26 वर्षांत एक कोटी रुपयांचा निधी निर्माण होऊ शकतो. म्हणजेच 8 वर्षांच्या आतच सरासरी एक कोटीचा निधी आधीच तयार होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.