Share Market : बाजार सुरु होण्याआधी आजचे टॉप १० परफॉर्मर शेअर्स जाणून घ्या

मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 416 अंकांनी घसरून 62867 वर बंद झाला.
Share Market Opening
Share Market Openingesakal
Updated on

Befor Opning Share Market Know Which Are Top 10 Performing Shares : शुक्रवारी 8 दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक लागला. ऑटो, एनर्जी आणि एफएमसीजी शेअर्सची विक्री झाली, तर आयटी, इन्फ्रा आणि फार्मा शेअर्सवर दबाव दिसला. त्याचवेळी रिऍल्टी आणि मेटल शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. तर मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 416 अंकांनी घसरून 62867 वर बंद झाला.

त्याचवेळी निफ्टी 116 अंकांनी घसरून 18696 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक 157 अंकांनी घसरून 43104 वर बंद झाला. तर मिडकॅप 283 अंकांनी वाढून 32567 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्स घसरले. त्याचवेळी निफ्टीच्या 50 पैकी 34 शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्स वाढले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

नुकत्याच झालेल्या उच्चांकानंतर बाजारात मंदी दिसून आली आणि जवळपास 0.5 टक्क्यांच्या घसरणीसह बाजार बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 0.62 टक्क्यांनी घसरून 18695 वर बंद झाला. पण बाजारात आणखी मजबूती येण्याची चिन्हे आहेत. पण जोपर्यंत निफ्टी 18300 च्या वर राहील तोपर्यंत सकारात्मक कल त्यात राहील असे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या रॅलीत बाजार ओव्हरबॉट झोनमध्ये गेला होता असे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. युरोप आणि आशियातील कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुक केला. अलीकडील जीडीपी आणि जीएसटीचे आकडे अपेक्षेप्रमाणे आहेत. पण पुढील जागतिक संकेत भारतीय बाजारपेठेची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. आता बाजारासाठी दोन तत्काळ ट्रिगर आहेत. पुढील आठवड्यात होणारी आरबीआयची धोरणात्मक बैठक आणि डिसेंबरच्या मध्यात होणारी यूएस फेडची धोरण बैठक नजीकच्या काळात गुंतवणूकदारांचा मूड ठरवेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • डिक्सन (DIXON)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.